अ‍ॅपशहर

मुंबईची घसरण

वैद्यकीय शिक्षणातील प्रवेशासाठीची अत्यंत महत्वाची आणि पहिली पायरी असलेल्या 'नीट' परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेचा गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कट ऑफ तर घसरला आहेच, परंतु अव्वल विद्यार्थ्यांच्या यादीत मुंबईचा एकही टॉपर नाही ही दखल घेण्याजोगीच बाब आहे.

Maharashtra Times 6 Jun 2018, 12:14 am

वैद्यकीय शिक्षणातील प्रवेशासाठीची अत्यंत महत्वाची आणि पहिली पायरी असलेल्या 'नीट' परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेचा गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कट ऑफ तर घसरला आहेच, परंतु अव्वल विद्यार्थ्यांच्या यादीत मुंबईचा एकही टॉपर नाही ही दखल घेण्याजोगीच बाब आहे.

नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, नीट ही एमबीबीएस, बीडीएस आणि विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची देशपातळीवरील परीक्षा आहे. यावर्षी या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील आणि अर्थातच मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे एक लाख ७७ हजार ३५३ इतकी होती. त्यातून केवळ ७० हजार १८४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. देशात सर्वाधिक पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हरियाणा, दिल्ली, तेलंगण, केरळ इत्यादी राज्यातील विद्यार्थी आघाडीवर आहेत. ही परीक्षा घेणाऱ्या सीबीएसइ बोर्डाने जाहीर केलेल्या या निकालात बहुतांश विद्यार्थ्यांना केमिस्ट्री निकालात एक अंकी गुण मिळाले आहेत. पहिल्या ५० टॉपर्समध्ये राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश असला, तरी मुंबईतील एकाही विद्यार्थ्याचे नाव त्यात नाही. वैद्यकीय शिक्षणात अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक चांगले पर्याय उपलब्ध असलेल्या महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा राज्यातीलच वैद्यकीय महाविद्यालयांकडे अधिक असल्याने राज्यातील प्रवेशपद्धतीकडे ते अधिक झुकलेले असावेत आणि 'नीट'कडे त्यांचा पुरेसा कल नसावा असा एक अंदाज आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम the fall of mumbai
मुंबईची घसरण

वैद्यकीय शिक्षणचे शुल्क देशभरच परदेशाच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक असल्याने अनेकांचा कल सध्या थेट परदेशातच वैद्यकीय शिक्षणासाठी जाण्याचा आहे. परदेशातील शिक्षणपद्धत अधिक सुलभ आणि विद्यार्थीस्नेही असल्यानेही तिथे प्रवेश मिळवण्यासाठी पसंती दिसते. मुंबईच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 'नीट'मध्ये कमी असण्याचे हेही एक कारण आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याकडील वैद्यकीय शिक्षणाचे शुल्क सरकारने जे भरमसाठ वाढवले आहे, त्याकडे पाहायला हवे. यंदा 'नीट'चा कट ऑफ एकंदरीतच खाली आलेलाही दिसतो आहे. खुल्या गटासाठीचा कटऑफ गेल्या वर्षी १३१ इतका होता, तो यंदा ११९वर उतरला आहे. या सर्व बाबींचा विचार तज्ज्ञ मंडळी करतीलच, मात्र मुंबई आणि महाराष्ट्रही 'नीट'मध्ये नीट दिसावा असेच कोणाचेही मत असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज