अ‍ॅपशहर

दुर्दैवी निर्णय

दुर्दैवी निर्णय जगप्रसिद्ध 'न्यूयॉर्क टाइम्स' वृत्तपत्राने आपल्या अंकातून राजकीय व्यंगचित्राला कायमची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला असून या दुर्दैवी ...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2019, 8:18 am
जगप्रसिद्ध 'न्यूयॉर्क टाइम्स' वृत्तपत्राने आपल्या अंकातून राजकीय व्यंगचित्राला कायमची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला असून या दुर्दैवी निर्णयाच्या विरोधात अमेरिकेतील व्यंगचित्रकारांसोबत असंख्य वाचकांनीही हा निर्णय चुकीचा असल्याने तो मागे घेण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम unfortunate decision of new york times
दुर्दैवी निर्णय


दोन महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यावरील व्यंगचित्रामुळे ते ज्यूविरोधी असल्याची टीका झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. प्रत्यक्षात याबद्दल वृत्तपत्राने तेव्हाच दिलगिरी व्यक्त केली होती. आता व्यंगचित्रकारांशी असलेला करार रद्द करण्याची घोषणा करताना न्यूयॉर्क टाइम्सने या प्रकरणाशी त्याचा संबंध जोडला नसला, तरी अमेरिकेतील अंकातून व्यंगचित्र बंद केल्यानुसार आता आंतरराष्ट्रीय आवृत्त्यातूनही ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्या विरोधात व्यंगचित्रकारांनी हा निर्णय चुकीचा आणि दुर्दैवी असून संपादकांनी आपल्या हातून व्यंगचित्राची निवड करण्यात चूक झाली म्हणून व्यंगचित्रच बंद करणे गैर व अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

'व्यंगचित्रात एकच एक ठोस विधान असते, त्यात अग्रलेखात असते तसे 'आणि दुसऱीकडे…' असे म्हणण्याची सुविधा नसते. न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकांकडून पूर्वी चुकीचे शब्द लिहिले, छापले गेले आहेत. त्यामुळे अजिबात चूक होता कामा नये अशी कातडीबचावू भूमिका घ्यायची असल्यास शब्दही छापणे बंद करा', अशी जळजळीत प्रतिक्रिया कमी करण्यात आलेल्या व्यंगचित्रकाराने दिली आहे. वाचकांनीही व्यंगचित्राची गरज असून त्यांनी ते नियमितपणे स्थानिक आवृत्त्यांतही छापावे असे म्हटले आहे. काहींनी ही भ्याडपणाची भूमिका आहे असे म्हटले आहे. तथापि, गेल्या काही वर्षांत व्यंगचित्रकारांची संख्या आणि अवकाश हळुहळू कमी होत आहे. सम्राट उघडा आहे हे केवळ सांगण्याची नव्हे तर त्याला तसा दाखविण्याची ही कला आजच्या संकुचित होत चाललेल्या अवकाशात कशी गुदमरत आहे याचे हे एक खिन्न उदाहरण आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज