अ‍ॅपशहर

नवे आव्हान

अहिर हे एप्रिल २०२१पासून भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. या घटकाला भाजपशी जुळवून ठेवण्यात त्यांचे प्रयत्न वाखाणले जातात. ६८ वर्षीय अहिर यांची राजकीय कारकिर्द १९८० साली भारतीय जनता युवा मोर्चामधून सुरू झाली.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 5 Dec 2022, 6:49 am
भाजपचे राष्ट्रीय राजकारणातील विदर्भातील सक्रिय नेते अशी हंसराज अहिर यांची ओळख आहे. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी ‘कार्यकर्ता’पण सोडले नाही. पक्षानेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले नाही. माजी केंद्रीय गृहमंत्रिपद भूषविलेल्या अहिर यांना केंद्राने राष्ट्रीय मागसवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद दिले आहे. नुकताच त्यांनी हा पदभार स्वीकारला. अहिर हे एप्रिल २०२१पासून भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. या घटकाला भाजपशी जुळवून ठेवण्यात त्यांचे प्रयत्न वाखाणले जातात. ६८ वर्षीय अहिर यांची राजकीय कारकिर्द १९८० साली भारतीय जनता युवा मोर्चामधून सुरू झाली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hansraj ahir
नवे आव्हान


१९८६ साली ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य झाले. दहा वर्षे ते जिल्हाध्यक्ष होते. हे चंद्रपूरचे चार वेळा खासदार राहिले आहेत. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर २००४, २००९, २०१४ ची खासदारकीची निवडणूक जिंकली होती. तत्पूर्वी १९९४ ते १९९६ असे दोन वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. संसदेच्या विविध महत्त्वाच्या समित्यांवर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. ते केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री आणि नंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री होते. संसदेच्या इतर मागसवर्गीय कल्याण समितीचे सदस्य होते. दिल्लीच्या राजकारणात दीड दशकांहून अधिक काळापासून सक्रिय असलेले अहिर यांचा वन आणि खाण हा अभ्यासाचा विषय आहे. चंद्रपूरला या दोन्ही संपदा भरभरून लाभल्या आहेत. त्यांनी यूपीए सरकारच्या काळातील कोळसा घोटाळ्याचा सातत्याने पाठपुरावा केला. राष्ट्रीय मागसवर्गीय आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारताना त्यांनी या घटकाच्या कल्याणासाठी झटण्याचा निर्धार व्यक्त केला. मागासवर्गीयांची हक्कांसाठी आंदोलने सुरू असण्याचे हे दिवस; तसेच आमच्या हक्कांवर गदा येत असल्याच्या कारणांवरून या घटकाकडून रोष व्यक्त होत असल्याचेही हे दिवस आहेत. अशा या वातावरणात अहिर यांच्या वाट्याला ही महत्त्वाची जबाबदारी आली आहे. त्यामुळेच त्यांच्या या नव्या कारकिर्दीकडे लक्ष लागून राहणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज