अ‍ॅपशहर

हेमल इंगळे

कोल्हापूरच्या हेमल इंगळेने मिस अर्थ इंडिया किताब पटकावून देशात कोल्हापूरचे नाव उजळवले आहे. अमेरिकेत लवकरच होणाऱ्या मिस अर्थ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या रँपवर जाण्यासाठी ती सज्ज झाली आहे.

Maharashtra Times 12 Nov 2016, 12:39 am
कोल्हापूरच्या हेमल इंगळेने मिस अर्थ इंडिया किताब पटकावून देशात कोल्हापूरचे नाव उजळवले आहे. अमेरिकेत लवकरच होणाऱ्या मिस अर्थ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या रँपवर जाण्यासाठी ती सज्ज झाली आहे. गेल्याच आठवड्यात कोल्हापूरच्याच रेश्मा माने हिनं राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून कोल्हापूरचे नाव जगभर गाजवले होते. या दुधात साखर म्हणून की काय आता हेमलने कोल्हापूर केवळ मर्दानी खेळातच आघाडीवर नाही तर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे आपल्या कर्तबगारीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. रेश्मा माने, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, अनुजा पाटील, गौरी शिरोडकर, अनुष्का पाटील या सर्वांनीच क्रीडा आणि विविध क्षेत्रात हम भी कुछ कम नहीं असे म्हणत महाराष्ट्राचा झेंडा केवळ भारतातच नव्हे तर जगभरात फडकवत ठेवला आहे. याच पावलावर आता हेमलनंही आपले दमदार पाऊल टाकले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hemal ingale
हेमल इंगळे


देशातील बहुतांशी राज्ये गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळली होती. अशा परिस्थितीत सौंदर्यस्पर्धा आणि पर्यावरण संवर्धन हा नवा धागा गुंफण्याच्या प्रक्रियेत हेमलने पाऊल टाकले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ‘मिस अर्थ’ या एकमेवाद्वितीय सौंदर्य स्पर्धेत हेमल इंगळे हे मऱ्हाठमोळे नाव निवडले गेले. नुकत्याच दिल्लीत झालेल्या या स्पर्धेच्या महत्त्वाच्या फेरीत हेमल देशाची प्रतिनिधी म्हणून अव्वल ठरली. स्पर्धेसाठी कोल्हापुरातून निवड होणारी हेमल ही पहिलीच मुलगी आहे. या फेरीत महाराष्ट्रातून पाच स्पर्धक होत्या. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने गेल्या वर्षी घेतलेल्या ‘श्रावणक्वीन’ स्पर्धेत हेमल पहिल्यांदाच ब्युटीरँपवर आली होती. या मंचावर ती तेव्हा अव्वल ठरली नसली तरी लक्षवेधी चेहरा म्हणून तिने पसंती मिळवली होती. पुढे दोनच महिन्यांनी ‘मिस युनिव्हर्सिटी’ हा किताब हेमलने पटकावला ते तिचे ब्युटी कॉन्स्टेस्टमधले दुसरे पाऊल. मिस युनिव्हर्सिटी स्पर्धेत तिने मुकुट पटकावला. ‘मिस अर्थ’ या स्पर्धेसाठी बंगळुरूत झालेल्या प्राथमिक फेरीत तिची निवड झाल्यानंतर ‘ब्युटी इज फॉर दि कॉज’ या टॅगलाइनखाली पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्यासाठी हेमल कार्यरत होती. मिलिंद इंगळे यांच्या सोबत ‘मऊ ढगांचा पाऊस,’ या अल्बमध्येही ती झळकली आहे.

सध्या हेमल सीएस कोर्स करत असून ती पुण्यात शिक्षण घेत आहे. सौंदर्य स्पर्धांत सहभागी होणे किंवा मॉडेलिंग करणे हे ती केवळ छंद म्हणूनच ठेवणार आहे. मात्र, इतर स्पर्धेपेक्षा मिस अर्थ स्पर्धेला सामाजिक किनार आहे. या निमित्ताने पर्यावरण जी आजची गरज आहे, अशा विषयावर काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी तिची भावना आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज