अ‍ॅपशहर

मंजिरी असनारे-केळकर

दिवंगत गायिका किशोरी आमोणकर यांचे पहिले शिष्य आणि प्रसिद्ध गायक डॉ. अरुण द्रविड यांच्यातर्फे यंदापासून देण्यात येणारा पहिलाच एक लाखाचा ‘गानसरस्वती’ पुरस्कार जयपूर-अत्रौली घराण्याच्या मंजिरी असनारे-केळकर यांना जाहीर होणं, हा एक सुरेख योग आहे. आपली कारकीर्द उत्तम सुरू असतानाही मंजिरी यांनी काही वर्षांपूर्वी किशोरीताईंकडे गाणं शिकण्याची इच्छा व्यक्त केली, आणि त्यांनी ते तत्काळ मानलं. किशोरीताई जाईपर्यंत ही तालीम सुरू होती. त्यामुळेच गुरुच्या नावाचा पुरस्कार शिष्याला मिळणं, म्हणजे सुरेख आशीर्वादयोग! अर्थात हे मंजिरी यांच्या आजवरच्या संगीतनिष्ठेचंही फळ आहे.

Maharashtra Times 23 Sep 2017, 2:30 am

महाराष्ट्र टाइम्स.कॉम manjiri asnare kelkar
मंजिरी असनारे-केळकर

सांगलीत जन्मलेल्या ‌मंजिरी यांच्या घरातच संगीत होतं. त्यांचे आजोबा उत्तम तबलावादक होतेच, परंतु वडीलही तबला वाजवत. परंतु पहिल्यापासून संगीताचं नीट शिक्षण मिळावं, यासाठी पाचव्या वर्षी मंजिरीला संगीतशाळेत घालण्यात आलं. सोबतच कथकचं शिक्षण. या दोन्ही कलांमध्ये त्यांनी उत्तम गती प्राप्त केली. दहाव्या वर्षी रंगमंचावर कथकचं नव्वद मिनिटांचं सादरीकरण केलं. तर गाण्यासाठी ग्वाल्हेर घराण्याचे गायक चिंतुबवा म्हैसकर यांची तालीम सुरू झाली. लहान असेपर्यंत संगीत आणि नृत्य बरोबरीने सुरू होतं. परंतु अंतिम निवड करताना, मंजिरी यांनी नृत्याला अलविदा केला. खरंतर एका टप्प्यावर इंजिनीअरिंग की संगीत असाही प्रश्न मंजिरी यांच्यासमोर उभा राहिला. मात्र, त्याचवेळी ऑल इंडिया रेडिओतून निवृत्त झालेले जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. मधुसूदन कानेटकर पुन्हा सांगलीत आले आणि त्यांच्याकडेही तालीम सुरू झाली. आज मंजिरी जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका म्हणून प्रख्यात आहेत, त्या त्यामुळेच. सोबत गुलुभाई जसदनवाला यांचीही तालीम त्यांना मिळाली. पं. कानेटकर आणि गुलुभाई दोघांचंही संगीतशिक्षण थेट उस्ताद अल्लादिया खाँसाहेबांचं चिरंजीव भुर्जीखाँ यांच्याकडे झालेलं असल्यामुळे मंजिरींना जयपूर घराण्याच्या स्वर-तालाची नेमकी तालीम मिळाली. त्यामुळेच जयपूर-अत्रोली घराण्याच्या वारसदार म्हणून त्यांच्याकडे आज आशेने पाहिलं जातं आणि आजवर त्यांनीही देश-विदेशात आपलं दमदार गाणं सादर करून स्वतःला सिद्ध केलं आहे.

विशेष म्हणजे त्यांच्या या गायनकौशल्यावर वेळोवेळी पुरस्कारांची नाममुद्रा उमटून त्या योग्य वाटेवर असल्याचं सूचनही झालं. संगीत नाटक अकादमीतर्फे देण्यात येणारा भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्या नावाचा पहिलाच युवा पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्याशिवाय मध्यप्रदेश सरकारच्या कुमार गंधर्व पुरस्कारापासून अनेक मानाचे पुरस्कार आजवर त्यांना मिळाले. त्यातच किशोरी आमोणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पहिलाच ‘गानसरस्वती’ पुरस्कार मंजिरी यांना जाहीर झाला आहे. किशोरीताईंच्या शेवटच्या काळात त्यांच्याकडे तालीम घेण्याची संधी मिळालेल्या मंजिरी यांचा यापेक्षा चांगला गुणगौरव कोणता असू शकेल?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज