बीड जिल्ह्यातील डोंगराळ भागातील पाटोद्याच्या राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाइलमध्ये बाँझपदक पटकावले. ब्राँझपदक जिंकणारा राहुल हा महाराष्ट्राचा पहिलाच मराठमोळा. एकूण भारताचा तिसरा मल्ल. त्याआधी महाराष्ट्राच्या नरसिंग यादवने २०१५ तर संदीप यादवने २०१३मध्ये पदक पटकावले. लहानपणी राहुल हा उनाडक्या करणारा आणि वर्गात दंगेखोर. त्याच्या तापट स्वभावामुळे वडील बाळासाहेब यांनी त्याला कुस्तीकडे वळविले. एक तापट मुलगा ते एक चांगला मल्ल असा त्याचा प्रवास झाला आहे.
माती व देशासाठी खेळणाऱ्या राहुलने आजवर जागतिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत पदक जिंकले आहे. राहुलने २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर २००९ व २०११ च्या आशियाई स्पर्धेत तो ब्राँझ पदकाचा मानकरी ठरला. राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने पाचवेळा सुवर्णपदक जिंकले. जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री स्टाइल खेळणाऱ्या राहुलने मराठी पताका फडकविली. राहुलच्या पराक्रमाने सारे कुस्तीप्रेमी खूष आहेत. रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार हे त्याचे गुरू तर सध्या विख्यात मल्ल काका पवार यांच्याकडे तो नवनवीन डाव शिकत आहे. हे ब्राँझपदकही राहुलने हरिश्चंद्र बिराजदार यांनाच समर्पित केले आहे.
राहुलला ‘लक्ष्य ऑलम्पिक’ या योजनेत क्रीडा खात्याची आर्थिक मदत मिळाली आहे. हे वर्ष राहुलसाठी खूप चांगले व यशस्वी चालले आहे. इटली व चीनच्या स्पर्धांमध्ये त्याने ब्राँझपदक तर तुर्कीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धांमुळेच त्याला या स्पर्धेत पदक जिंकण्याची ऊर्जा मिळाली आहे. जागतिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न साकार झाले असले तरी ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन देशासाठी पदक जिंकण्याची त्याची मनीषा आहे. देशाबरोबरच मराठवाडा आणि महाराष्ट्राचे नावही राहुलने उज्ज्वल केले आहे.