अ‍ॅपशहर

टीटीव्ही दिनाकरन

नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत तमिळनाडूतील आरके नगर या अत्यंत चर्चित आणि वादग्रस्त मतदारसंघात आपली निर्णायक छाप टाकून विजय मिळवणारे टीटीव्ही दिनाकरन यांनी शुक्रवारी आमदारकीची शपथ घेऊन आपला नवा प्रवास सुरू केला आहे.

Maharashtra Times 30 Dec 2017, 12:48 am
नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत तमिळनाडूतील आरके नगर या अत्यंत चर्चित आणि वादग्रस्त मतदारसंघात आपली निर्णायक छाप टाकून विजय मिळवणारे टीटीव्ही दिनाकरन यांनी शुक्रवारी आमदारकीची शपथ घेऊन आपला नवा प्रवास सुरू केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ttv dinakaran
टीटीव्ही दिनाकरन


मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूच्या राजकीय वातावरणात खूप बदल झाले. जयललिता यांच्या विश्वासू शशिकला आता तुरुंगात आहेत. पक्षांत दोन भिन्न गट निर्माण झाले आहेत. तरीही हा आरके नगर मतदारसंघ जयललिता यांच्या प्रभावाखालचा. आणि दिनाकरनही पक्षाचेच. मात्र त्यांना पक्षातून काढून टाकल्याने त्यांनी अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडणूक लढविली. पक्षाने आपले अधिकृत उमेदवार म्हणून मधुसुदनन यांना उभे केले होते.

जनमानसात त्यांची प्रतिमाही उत्तम आहे. शिवाय तामिळनाडूतील राजकीय पट पाहता तेथील अण्णा द्रमुक असो वा द्रमुक असो, हे दोन्ही प्रमुख पक्ष उत्तम संघटनात्मक कौशल्यातून चालणारे आहेत. तरीही दिनाकरन यांनी आपल्या माजी पक्षातील अधिकृत उमेदवार आणि विरोधी द्रमुकचा उमेदवार या दोघांनाही चांगलीच धोबीपछाड दिली. त्यांनी अपक्ष म्हणून पन्नास टक्क्यांहून अधिक मते गोळा करून चाळीस हजार मताधिक्याने विजय प्राप्त केला. राज्यातील सतत बदलत्या आणि नाट्यपूर्ण राजकीय पटलावर त्यांनी घडवून आणलेले हे नवे वळण आहे. जयललिता यांच्या निधनाने निर्माण झालेली पक्षातील तसेच राज्यातील नेतृत्वाची पोकळी कोण भरून काढणार हा प्रश्न चर्चेत असताना त्यांनी हा विजय प्राप्त केला आहे. त्यातून त्यांनी स्वतः आणि अण्णा द्रमुक पक्षाचे मधुसुदनन यांनी एकत्रितपणे ७७ टक्क्यांहून अधिक मते मिळवली आहेत. याचा अर्थ अण्णा द्रमुकचा समर्थक पक्षाकडेच आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, मधुसुदन यांचे वय त्यांच्या विरोधात गेले आणि ५४ वर्षीय दिनाकरन यांना त्याचा नैसर्गिक फायदा मिळाला. हे जर खरे असेल तर त्यांनी राज्य सरकारला दिलेला इशारा गंभीरपणे घ्यायला हवा. येत्या मार्चमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिकवेशनात या सरकारचे भवितव्य निश्चित होईल, असे त्यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आणि शशिकला यांची बंगळुरू तुरुंगात भेट घेतल्यानंतर जाहीर केले आहे. त्यांच्या बोलण्यातून बहुतेक आमदार आपल्या बाजूने आहेत हे स्पष्टपणे ध्वनित होते. मुख्यमंत्री इ. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यावर थेट टीका करून त्यांनी खरा अण्णा द्रमुक पक्ष आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज