अ‍ॅपशहर

स्टेन्ट खरेदीतील काळाबाजार थांबणार!

Maharashtra Times 24 Feb 2017, 2:36 pm
गेल्या आठवड्यात सरकारने कोरोनरी स्टेन्टच्या किमती ८५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय जाहीर करून भविष्यात अनेकांच्या हृदयाची धडधड कमी केली आहे, असे म्हणायला हरकत नाही. कारण गेली कित्येक वर्षे मूळ किमतीच्या ६-७ पट अधिक किमती आकारून हॉस्पिटल्स हृदयाचा विकार असलेल्या रुग्णांना या स्टेन्ट्स विकत होते. स्टेन्ट विक्रीत हा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू होता. स्टेन्टच्या किमती वाढण्याचे मूळ कारण म्हणजे देशात स्टेन्ट बनविण्याऱ्या एकूण ११ कंपन्या आहेत, तरीही स्टेन्टची मागणी लक्षात घेता परदेशी कंपन्यांकडूनही स्टेन्ट्स आयात केले जातात. आयात केलेल्या स्टेन्टवर परदेशी कंपन्या मूळ किमतीच्या २-३ पट अधिक एमआरपी आकारतात. अशावेळी वाढलेल्या किमतींमध्ये आपले मार्जिन काढण्याची संधी साधून खासगी हॉस्पिटल्स यात आणखी कित्येक पटीने किमती वाढविण्यासाठी परदेशी कंपन्यांचेच स्टेन्ट विकत घेत होते. सरकारने स्टेन्ट किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला असून आरोग्य क्षेत्रात होत असलेली ही फसवणूक यामुळे थांबणार आहे... त्यानिमित्तानेच पाहुयात स्टेन्ट बाजारात कसा होत होता हा काळाबाजार आणि तो थांबविण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली ते, या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम coronary stent scam
स्टेन्ट खरेदीतील काळाबाजार थांबणार!








महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज