अ‍ॅपशहर

kerala assembly election 2021 : केरळ विधानसभा निवडणूक, भाजपला यश येणार का?

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वतः केरळमध्ये प्रचारसभा घेत आहेत. दुसरीकडे भाजपने मेट्रो मॅन इ श्रीधरन यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केले आहे. यामुळे केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपला यश येते की सत्ताधारी डावी एलडीएफ आघाडी सत्ता टिकवण्यात कायम राहते, याची उत्सुकता आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Mar 2021, 2:08 am
तिरुवनंतपूरमः केरळमध्ये विधानसभा निवडणूक ( kerala election 2021 ) होत आहे. केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. केरळमध्ये एकूण १४ जिल्हे आहेत. सर्व १४ जिल्ह्यांमधील एकूण १४० मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. ६ एप्रिलला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kerala assembly
केरळ विधानसभा निवडणूक, भाजपला यश येणार का?


केरळमध्ये सध्या LDF सत्तेत

केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंट (LDF) या डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता आहे. पी. विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. केरळमध्ये सत्ताधारी डावी आघाडी, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत आहे.

निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचा अंदाज काय सांगतो?

सर्वेक्षणानुसार केरळमधील १४० जागांवर डाव्या पक्षांचे नेतृत्व असलेल्या सत्ताधारी एलडीएफला ८२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला ५६ जागा जिंकेल असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात मुख्यमंत्री पी. विजयन हे जनतेची पहिली पसंत आहेत. तर केरळमध्ये भाजपला झटका बसण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपला फार फार तर १ जागा मिळेल, असा अंदाज आहे. केरळमध्ये भाजपने 'मेट्रो मॅन' इ श्रीधरन यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

केरळ विधानसभा निवडणूक
एकूण जागा - १४०
मतदान - ६ एप्रिल (एकाच टप्प्यात मतदान)
निकाल - २ मे रोजी
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज