अ‍ॅपशहर

रणबीरला सोडून 'या' खास व्यक्तीसोबत आलिया पोहोचली डिनर डेटवर!

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या नात्याची चर्चा तर सोशल मीडियावर नेहमीच सुरू असते. अनेकदा हे दोघं एकमेकांसोबत डिनर किंवा लंचला जाताना दिसतात. पण यावेळी आलिया रणबीर नाही तर दुसऱ्याच एका खास व्यक्ती सोबत डिनर डेटवर गेली होती.

Lipi 6 Feb 2021, 1:18 pm
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. कधी तिचे आगामी चित्रपट तर कधी तिच्या रिलेशनशिपची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते. आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिप बद्दल तर सर्वांनाच माहित आहे. हे दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट केले जातात. पण आता रणबीरला सोडून आलिया एका खास व्यक्तीसोबत डेटवर गेल्याचं पाहायला मिळालं आहे. या डेटचे फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम actress aalia bhat on dinner with sister shaheen bhatt photo viral
रणबीरला सोडून 'या' खास व्यक्तीसोबत आलिया पोहोचली डिनर डेटवर!


कमाल आर खानची कंगना रणौत आणि दिलजीत दोसांजकडे अजबच मागणी

नुकतीच आलिया एका खास व्यक्तीसोबत डिनर डेटला गेलेली पाहायला मिळाली. पण ही व्यक्ती रणबीर कपूर नसून तिची बहीण शाहिन भट होती. आलिया आणि शाहिनमधील बॉन्डिंग तर सर्वांनाच माहित आहे. शाहिननं स्वतः तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या आणि आलियाच्या डिनर डेटचा फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शाहिननं लिहिलं, 'डिनर डेट' या फोटोमध्ये आलिया रेड ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. जो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.


आलिया आणि शाहिनमध्ये नेहमीच खास बॉन्डिंग पाहायला मिळतं. आलिया अनेकदा शाहिनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच अनेकदा दोघीही डिनर किंवा लंच जाताना दिसतात. रणबीर कपूर आणि आलियाच्या नात्याबद्दल बोलायचं तर हे दोघंही मागच्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. २०२० मध्ये हे दोघंही लग्न करणार अशी चर्चा होती. मात्र आता या दोघांनीही सध्या तरी लग्नाचा कोणताही प्लान नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कोणत्याही फंक्शनच्या वेळी मात्र कपूर आणि भट फॅमिलीज एकत्र दिसतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज