अ‍ॅपशहर

तगड्या मानधनासाठी नाकारले सिनेमे आता होतोय पश्चाताप!; कोण आहेत बॉलिवूडचे हे कलाकार?

कलाकार जितका मोठा तितकं त्याचं मानधन तगडं. कलाारांच्या मानधनाची तितकीच चर्चा होत असते. मानधन मनासारखं न मिळाल्यानं अनेक कलाकारांनी चित्रपट नाकारले आहेत.

Lipi 11 Apr 2021, 10:12 am

हायलाइट्स:


पैशांच्या मोहापायी गमावले हे सिनेमे
आता त्या कलाकारांना होतो आहे पश्चाताप
कोण आहेत हे बॉलिवूडचे कलाकार

बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम because of greediness lot of celebrities lost superhit films
तगड्या मानधनासाठी नाकारले सिनेमे आता होतोय पश्चाताप!; कोण आहेत बॉलिवूडचे हे कलाकार?
मुंबई: बॉलिवूडमध्ये जेव्हा सिनेमांची निर्मिती करतेवेळी त्यावर पाण्यासारखा पैसा ओतला जातो. मोठे मोठे सेट उभारण्यापासून ते प्रसिद्ध कलाकारांनी सिनेमात काम करावे यासाठी त्यांना दमदार असे मानधन दिले जाते. आजमितीला बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ते सिनेमाचे स्क्रिप्ट बघून त्यात काम करण्यासाठी तयार होतात. तर काही कलाकारांना काम करण्यासाठी भरभक्कम मानधन हवे असते. अनेकदा त्यांना हवे तितके मानधन न मिळाल्याने हे कलाकार सिनेमा करायला नकार देतात. असे कोणते कलाकार आहेत की पैशांचा हव्यास ठेवल्याने त्यांना सुपहिट सिनेमात काम करण्यासाटी नकार दिला हे जाणून घेऊ यात...
करीना कपूर खान





बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर अर्थात बेबो. करीना ही बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. करीना एका सिनेमासाठी एक कोटी रुपये घेते! इतकेच नाही तर केवळ ए कॅटेगरीतील कलाकारांसोबत काम करणार अशी तिची अट असते. करीनाने तिच्या करीअरची सुरुवातील तिने 'कल हो ना हों' या सिनेमातील नैना ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नकार दिला होता. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तिने जास्त मानधन मागितल्याची चर्चा होती. इतके मानधन निर्माते देण्यास तयार नव्हते त्यामुळे हा सिनेमा करण्यास तिने नकार दिला. त्यानंतर ही भूमिका प्रिती झिंटाने साकारली. हा सिनेमा सुपरहिट झाला.

शाहरुख खान





बॉलिवूडचा किंग खान म्हणून याला ओळखले जाते. या कलाकाराला सिनेमात घ्यायचे असेल तर निर्मात्याचे बजेट तगडे असावे लागते. पद्मावत या सिनेमातील अलाउद्दीन खिलजी ही भूमिका साकारण्यासाठी जेव्हा शाहरुखला विचारले तेव्हा त्याने ९० लाख रुपये मागितल्याची चर्चा होती. परंतु इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने ही भूमिका रणवीर सिंगकडे गेली. त्यानंतर हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

श्रीदेवी



दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या सौंदर्यांने रसिकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. श्रीदेवी यांनी एकाहून एक हिट हिंदी सिनेमांत काम केले असून आजही ते प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या 'बाहुबली' या सिनेमातील शिवगामी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी विचारणा केली होती. त्यासाठी श्रीदेवी यांनी मानधनापोटी एक मोठी रक्कमेची मागणी केली होती. त्यांची ही मागणी अमान्य झाली आणि ही व्यक्तिरेखा राम्याने साकारली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.

सोनाक्षी सिन्हा




बॉलिवूडमधील दंबग गर्ल अर्था सोनाक्षी सिन्हा. सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये येऊन बरीच वर्षे झाली आहेत, परंतु म्हणावे तसे तिचे करीअर सेट झालेले नाही. अजूनही सोनाक्षी तिच्या मानधनाच्या रक्कमेवर अडून आहे. सोनाक्षीला 'किक' या सिनेमासाठी विचारणा झाली होती. परंतु सोनाक्षीने त्यासाठी जास्त मानधन मागितल्यामुळे हा रोल जॅकलिनला मिळाली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

महत्वाचे लेख