मुंबई : आज म्हणजे रविवार १९ सप्टेंबरपासून छोट्या पडद्यावरील मनोरंजन अनलॉक होणार असून प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन होणार आहे. हे मनोरंजन अनलॉक करणारा कार्यक्रम आहे, 'बिग बॉस मराठी ३'.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तितकाच वादग्रस्त शो म्हणजे 'बिग बॉस'. हिंदीमधील ‘बिग बॉस ओटीटी’ चर्चेत असताना आता मराठी बिग बॉसच्या तिस-या पर्वाची घोषणा केली. 'अनलॉक एण्टरटेनमेन्ट' अशी यंदाच्या पर्वाची टॅगलाइन आहे. बिग बॉस मराठी ३ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. या पर्वात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याबद्दल उत्सुकता असून यात देवमाणूस मालिकेतील एक अभिनेत्री सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
देवमाणूस मालिकेतील अॅडव्होकेट आर्या म्हणजेच अभिनेत्री सोनाली पाटील बिग बॉसच्या घरात येणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. वाहिनीकडून शेअर करण्यात आलेल्या एका प्रोमोमध्ये सोनालीची झलक पाहायला मिळत आहे.