अ‍ॅपशहर

'बंटी और बबली २'चं प्रदर्शन लांबणीवर, सलमानचा 'राधे'ही संकटात; काय आहे कारण

मागच्या वर्षी करोना व्हायरसमुळे बॉलिवूडचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक चित्रपटांचं शूटिंग रखडलं होतं. पण नंतर करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर चित्रपटगृह सुरू करण्यात आली आहेत. पण मागच्या बऱ्याच काळापासून प्रदर्शनाच्या तयारीत असेलेल्या 'बंटी और बबली २' प्रदर्शन पुन्हा लांबणीवर पडलं आहे.

मुंबई: मागच्या वर्षी करोना व्हायरसच्या संक्रमणामुळे अनेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. पण मागच्या बऱ्याच काळापासून प्रदर्शनाच्या तयारीत असलेल्या 'बंटी और बबली २' या चित्रपटाचं प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलं आहे. सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या २३ एप्रिलला रिलीज होणार होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bunty aur babli 2 release gets postponed due to corona
'बंटी और बबली २'चं प्रदर्शन लांबणीवर, सलमानचा 'राधे'ही संकटात; काय आहे कारण


चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली. तरण आदर्श यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, 'बंटी और बबली २' हा चित्रपट येत्या २३ एप्रिलला चित्रपटगृहात रिलीज होणार होता. मात्र आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. यशराज फिल्म लवकरच नव्या तारीखेची घोषणा करेल.


'बंटी और बबली २' हा चित्रपट २००५ मध्ये रिलीज झालेल्या 'बंटी और बबली' सीक्वेल आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खान यांच्यासोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सध्या चित्रपटगृह सुरू असली तरी करोनाच्या रुग्णांची संख्या मागच्या काही दिवसांत पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. अशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे.

मागच्या काही काळापासून बॉलिवूडचे अनेक कलाकार करोना पॉझिटीव्ह झाले आहेत. काही राज्य लॉकडाऊनच्या वाटेवर आहेत. तर काही राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे अशात बॉलिवूड चित्रपटाचं प्रदर्शन पुन्हा पुढे ढकललं जात आहे. मागच्या काही दिवसांत अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट समोर आल्या आहेत ज्यात सलमान खानच्या 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई'चा सुद्धा समावेश आहे. हा चित्रपट येत्या १३ मार्चला रिलीज होणार आहे. पण करोनाचं संक्रमण असंच वाढत राहिलं तर मात्र सलमानच्या चित्रपटाची रिलीज डेट सुद्धा बदलली जाऊ शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज