अ‍ॅपशहर

सोनाली फोगाट यांच्या घरी चोरी; दहा लाखांचे दागिने लंपास

बिग बॉस १४ ची स्पर्धक सोनाली फोगाटच्या घरी चोरी झाली असून यात रिवॉल्वर, जवळपास दहा लाखांचे दागिने आणि काही रोख रक्कम सुद्धा गहाळ झाली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

हायलाइट्स:

  • बिग बॉस स्पर्धक सोनाली फोगाट यांच्या बंद घरात चोरी
  • घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांचे दागिने, रोख रक्कम आणि लायसन्स असलेलं रिवॉल्वर याची केली गेली चोरी
  • भाजपा नेत्या सुद्धा आहेत बिग बॉस १४ च्या स्पर्धक सोनाली फोगाट
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cash jewellery weapons stolen from sonali phogats house
सोनाली फोगाट यांच्या घरी चोरी; दहा लाखांचे दागिने लंपास
मुंबई: बिग बॉस १४ च्या स्पर्धक आणि भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या बंद घरात चोरी झाल्याची माहिती मिळत आहे. चोरांनी घराचं कुलूप तोडून लाखो रुपयांचे दागिने, रोख रक्कम आणि लायसन्स असलेलं रिवॉल्वर या गोष्टी चोरी केल्या आहेत. या बाबतची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि फिंगर प्रिंट एक्सपर्ट टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. तसेच आजूबाजूच्या लोकांचीही चौकशी केली जात आहे.
डोगरान मोहल्लामध्ये राहणाऱ्या सोनाली फोगाट यांनी एचटीएम पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार केली आहे. त्यांनी सांगितलं की, ९ फेब्रुवारीला आपल्या घराला कुलूप लावून चंदीगढला गेल्या होत्या. जेव्हा त्या १५ फेब्रुवारीला चंदिगढमधून हिसारला परतल्या तेव्हा त्यांना घराचं कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आलं. जेव्हा त्यांनी तुटलेलं कुलूप पाहिलं तेव्हा त्या हैराण झाल्या. जेव्हा त्यांनी घरात जाऊन पाहिलं तेव्हा, त्यांना घरातील कपाटातून जवळपास १० लाखांचे दागिने, सोनं आणि चांदीची भांडी, घड्याळं आणि २२ बोर लायसन्सचं एक रिवॉल्वर ज्यात ८ गोळ्या लोड केलेल्या होत्या या वस्तू चोरून नेल्या आहेत.


सोनाली फोगाट यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे की, रिवॉल्वरच्या होलस्टरमध्ये असलेल्या गोळ्यासुद्धा त्यांना मिळाल्या नाहीत. याशिवाय इतर सामानही चोरीला गेलं आहे. तसेच एक डीव्हीआर सुद्धा चोरांनी चोरून नेला आहे. सोनाली फोगाट यांच्या तक्रारीनंतर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोण आहे ही अभिनेत्री? चाहत्यांनी चक्क बांधलं तिच्या नावाचं मंदिर; होतो दुधाचा अभिषेक

घरात झालेल्या चोरीनंतर सोनाली फोगाट यांनी तिथल्या पोलीस प्रशानाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांचं म्हणणं आहे की, जर त्या नेत्या असून त्यांचं घर सुरक्षित नाही तर मग सामान्य जनतेनं पोलीसांकडून काय अपेक्षा ठेवाव्यात. सोनाली फोगाट यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरच्या आसपासच्या भागात चोरी झाली होती. ज्याचा तपास अद्याप पोलीसांनी केलेली नाही. त्यामुळे आता पोलीसांना त्यांची जबाबदारी समजायला हवी.

View this post on Instagram A post shared by Sonali Singh BJP (@sonali_phogat_official)

महत्वाचे लेख