मुंबई- आपल्या तूफानी फलंदाजीने समोरच्याचे धाबे दणाणून सोडणारा क्रिकेटर म्हणजे ख्रिस गेल. ख्रिस हा वेस्ट इंडिज देशाचा खेळाडू असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ख्रिस त्याची बॅट घेऊन मैदानात उतरला म्हणजे चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणार याची क्रिकेटप्रेमींना खात्री असते. सध्या भारतात आयपीएल सुरू आहे आणि गेल पंजाब किंग्स टीमचा भाग आहे. सध्या गेल सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. पण ते त्याच्या फलंदाजीमुळे नाही तर त्याच्या नव्या गाण्यामुळे. ख्रिसचं 'जमैका टू इंडिया' हे गाणं नुकतंच युट्यूबवर प्रदर्शित झालं आहे. अक्षय खन्ना सैनिकाच्या रूपात चाहत्यांच्या भेटीला; 'या' सीरिजमध्ये दिसणार मुख्य भूमिकेत
ख्रिसने हे गाणं लोकप्रिय रॅपर एमीवे बंटाय सोबत बनवलं आहे. हे गाणं प्रदर्शित झाल्यावर चाहत्यांमध्ये गाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हे गाणं हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये बनवण्यात आलं आहे. गाण्यात हिंदी रॅप एमीवेने तर इंग्रजी रॅप ख्रिसने गायलं आहे. दोघांनी त्या गाण्यावर नृत्यदेखील केलं आहे. गाण्याचे बोल एमीवे आणि ख्रिसच्या टीमने लिहिले आहेत. तर गाण्याचं संगीत टोनी जेम्सने दिलं आहे. आयपीएलच्या सुरुवातीलाच हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे. गाण्यातील ख्रिस आणि एमीवेची जुगलबंदी प्रेक्षकांना भलतीच आवडली आहे.
सध्या ख्रिस आणि एमीवेचं गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. त्यांचं गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. चाहते त्यांचं तोंडभरून कौतुक करत आहेत. त्यांच्या गाण्यावर चाहत्यांच्या प्रचंड प्रतिकिया येत आहेत. काही तासांतच गाण्याला सात लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. हे गाणं ख्रिसच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. आयपीलच्या प्रेक्षकांना ख्रिसची ही अनोखी भेट नक्कीच आवडली आहे.
संजीदा शेखने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा व्हिडीओ, चाहते म्हणाले...