अ‍ॅपशहर

'द मॅरीड वूमन' च्या यशासाठी एकता कपूरनं अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवली चादर

निर्माती, दिग्दर्शिका एकता कपूर तिच्या आगामी 'द मॅरीड वूमन' च्या यशासाठी अजमेर शरीफला पोहोचली आहे. या वेबसीरिजच्या यशासाठी तिने दर्ग्यावर प्रार्थना केली आहे. तिची हि वेबसीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे.

मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका व निर्माती असलेली एकता कपूर राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यावर गेल्याची माहिती समोर येतेय. एकता तिच्या बहुचर्चित आगामी वेबसीरिजच्या यशासाठी प्रार्थना करायला तिथे गेली असल्याचं बोललं जातंय. एकताची 'द मॅरीड वूमन' ही वेबसीरिज काही दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणार आहे. त्यासाठी आशीर्वाद मिळावे म्हणून एकता अजमेर शरीफ यांच्या दर्ग्यावर गेल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. यावेळेस तिच्यासोबत वेबसीरिज मधील कलाकार रिद्धी डोग्रा आणि मोनिका डोग्रा देखील उपस्थित होत्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम एकता कपूर


अरेरे! जगातील सर्वात मोठे गाल मिळवण्याच्या नादात हे काय करून बसली ही मॉडेल

प्रसिद्ध लेखिका मंजू कपूर यांच्या अत्यंत गाजलेल्या पुस्तकावर 'द मॅरीड वूमन' ही वेबसीरीज बनवण्यात आली आहे. या वेबसीरिजच्या ट्रेलरला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. ही वेबसीरिज महिलांच्या आयुष्यावर आधारित असून त्यांच्या आवडीनिवडी, छंद, त्यांच्या भावना अधोरेखित करते. साधं आयुष्य जगणाऱ्या महिलांच्या आसपास फिरणारी कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद ठेवते. या वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी एकता जयपूर दौरा करत आहे.


छोट्या पडद्यावरचं चित्र बदलतंय; मालिकांमध्ये आई ठरतेय खलनायिका

या वेबसीरिजच दिग्दर्शन साहिर रजा यांनी केलं असून ही एक शहरातील तकलादू नात्यांच्या गोंधळावर आधारलेली कहाणी आहे. समाजामध्ये महिलांना मिळणारा मान, त्यांच्यावर लावले गेलेले निर्बंध आणि स्वतःला शोधण्याची जिद्द यावर ही वेबसीरिज आधारलेली आहे. यात रिद्धी डोग्रा आणि मोनिका डोग्रा मुख्य भूमिकांमध्ये असून त्यांच्यासोबत इमाद शाह, दिव्या सेठ शाह, नादिरा बब्बर आणि सुहास अहुजा या कलाकारांचा देखील सहभाग आहे. ही वेबसीरिज ८ मार्च रोजी ऑल्ट बालाजी आणि झी ५ वर प्रदर्शित होणार आहे.

महत्वाचे लेख