अ‍ॅपशहर

साठाव्या वर्षीही मी रोमँटिकच

‘गीत गाता चल’ या चित्रपटात मी जेवढा रोमँटिक होतो, तेवढाच रोमँटिक मी आजही आहे, म्हणत यंग@60 असलेल्या हीरोने आपल्या चाहत्यांवरील आपली सत्ता अबाधित राखली. अर्थात हा हीरो आहे, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचाही आवडता अभिनेता सचिन पिळगावकर! गुरुवारी सचिन यांनी वयाची साठी पूर्ण केली. त्यांनी वाढदिवसानिमित्त जुहूच्या एका हॉटेलमध्ये खास पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी मनोगतामध्ये तारुण्याचे रहस्य उलगडताना त्यांनी अजूनही रोमँटिक असल्याचे आवर्जून सांगितले.

Maharashtra Times 19 Aug 2017, 4:27 am
सचिन पिळगावकरांची नव्या इनिंगला सुरुवात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 60th birthday of sachin pilgaonkar
साठाव्या वर्षीही मी रोमँटिकच


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

‘गीत गाता चल’ या चित्रपटात मी जेवढा रोमँटिक होतो, तेवढाच रोमँटिक मी आजही आहे, म्हणत यंग@60 असलेल्या हीरोने आपल्या चाहत्यांवरील आपली सत्ता अबाधित राखली. अर्थात हा हीरो आहे, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचाही आवडता अभिनेता सचिन पिळगावकर! गुरुवारी सचिन यांनी वयाची साठी पूर्ण केली. त्यांनी वाढदिवसानिमित्त जुहूच्या एका हॉटेलमध्ये खास पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी मनोगतामध्ये तारुण्याचे रहस्य उलगडताना त्यांनी अजूनही रोमँटिक असल्याचे आवर्जून सांगितले.

वाढदिवसानिमित्त आयोजित खास पार्टीमध्ये पाहुणेही अर्थातच तेवढेच खास होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर, राज ठाकरे, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर, शंकर महादेवन, महेश कोठारे, जया बच्चन यांच्यासारखे दिग्गज सचिन पिळगावकर यांना शुभेच्छा द्यायला उपस्थित होते. या निमित्ताने अभिनय कारकीर्दीतील पाच दशकाहून अधिक काळाच्या आठवणींना उजाळा मिळाला.

या पार्टीमध्ये सचिन तेंडुलकरनेही खास उपस्थिती लावल्याने त्यांच्या इतर मित्रमंडळींसाठी तर हा सुवर्णकांचन योगच ठरला. एक सचिन फार न बोलणारा आणि दुसरा सचिन खूप बोलका असल्याचे सांगत सचिन तेंडुलकरच्या डोळ्यात पाहिल्यावर त्याला काय बोलायचे असते ते समजून येते, असे सचिन पिळगावकर यांनी सांगितले.

सचिन तेंडुलकरनेही लहानपणापासून सचिन पिळगावकर यांच्या आईने त्यांना कसे वाढवले हे आपल्या आईने सांगितले होते आणि त्यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर ते किती खरे होते, याची साक्ष पटल्याची भावना व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सचिन यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे यांनी तर अजूनही सचिन यांचे तारुण्य पाहून मोठेपणी कोण व्हावेसे वाटते हा प्रश्न विचारण्याची इच्छा होत असल्याचे सांगत या एव्हरग्रीन हीरोला शुभेच्छा दिल्या.

सचिन यांचे मित्र बप्पी लहरी यांनी किशोर कुमार यांच्या 'प्यार मांगा है तुम्ही से' या गाण्यातून सचिनला वाढदिवसाच्या अतिशय गोड शुभेच्छा दिल्या. 'याद आ राहा है' हे गाणेसुद्धा त्यांनी यावेळी सादर केले. जॅकी श्रॉफ यांनीही सचिन यांना खास शुभेच्छा दिल्या. सचिन यांच्या या नव्या इनिंगचे स्वागत करण्यासाठी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांसोबतच आयुष्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या त्यांच्या पत्नी सुप्रिया आणि मुलगी श्रीया यांनी हा दिवस अधिकच खास केला. त्याशिवाय स्वप्नील जोशी, अली असगर यांचाही या खास सेलिब्रेशनमध्ये उत्साही सहभाग होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज