अ‍ॅपशहर

सीट बेल्ट होता म्हणून...

'केवळ सीटबेल्ट बांधलेला होता, म्हणून मी बचावलो. अन्यथा माझं काही खरं नव्हतं. कारमधून प्रवास करताना सीटबेल्ट लावणं किती महत्त्वाचं आहे हे या निमित्तानं स्वत: अनुभवलं', हे शब्द आहेत महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांचे.

Maharashtra Times 23 Feb 2018, 9:00 am
मुंबई टाइम्स टीम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aadesh-bandekar


'केवळ सीटबेल्ट बांधलेला होता, म्हणून मी बचावलो. अन्यथा माझं काही खरं नव्हतं. कारमधून प्रवास करताना सीटबेल्ट लावणं किती महत्त्वाचं आहे हे या निमित्तानं स्वत: अनुभवलं', हे शब्द आहेत महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांचे. गुरुवारी त्यांच्या कारला झालेल्या अपघातातून सुदैवानं ते बचावले. यानंतर 'मटा'शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. बांदेकर यांच्याबरोबर प्रवास करणारे सगळे जण सुखरुप आहेत.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील कराड-वठारजवळ आदेश यांच्या वाहनाला गुरुवारी अपघात झाला होता. पुढच्या ट्रकमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं बांदेकर यांची गाडी मागून येणारी त्यावर आदळली. त्यामुळे त्यांच्या गाडीचा पुढचा भाग चेपला गेला. यावेळी कारचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला. मात्र, सीटबेल्ट लावलेला असल्यानं बांदेकर यांना सुदैवानं कोणतीही दुखापत झाली नाही. ते सुखरूप आहेत. यावेळी त्यांच्यासोबत सिद्धीविनायक मंदिराचे आणखी काही विश्वस्तही होते. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीचा धनादेश सोपवण्यासाठी ते निघाले होते. 'सीटबेल्ट लावण्याचं आवाहन नेहमी केलं जातं. ते किती महत्त्वाचं आहे हे स्वत: अनुभवलेल्या या प्रसंगामुळे लक्षात आलं. त्यामुळे कुठेही प्रवास करताना प्रवाशांनी सीटबेल्ट न विसरता लावायलाच हवा', असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज