अ‍ॅपशहर

'ठग्स ऑफ हिंदोस्तां'साठी आमिरने टोचले नाक आणि कान

बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी लूकसोबत प्रयोग करताना दिसतो. फक्त अभिनय नाही तर एखादी भूमिका साकारताना लुक्सला देखील आमिर प्राधान्य देतो. पी.के. असो वा दंगल आमिरने आपल्या लूकने नेहमीच प्रेक्षकांना चकीत केलं आहे. आमिरच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्याचा आगामी चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची. नुकताच ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील आमिरचा लुक समोर आला आहे.​ या चित्रपटासाठी आमिरने कान आणि नाक टोचले आहेत.आमिरचा हा हटके लुक पाहिल्यानंतर तुम्ही देखील चकीत व्हाल यात शंकाच नाही.

Maharashtra Times 28 Jun 2017, 10:32 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aamir khan again changed his look for thugs of hindostan
'ठग्स ऑफ हिंदोस्तां'साठी आमिरने टोचले नाक आणि कान


बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो. फक्त अभिनय नाही तर एखादी भूमिका साकारताना लुक्सला देखील आमिर प्राधान्य देतो. पी.के. असो वा दंगल आमिरने आपल्या लूकने नेहमीच प्रेक्षकांना चकीत केलं आहे. आमिरच्या चाहत्यांना उत्सुकता आहे ती त्याचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तां’ची. नुकताच ​ 'ठग्स ऑफ हिंदोस्तां’मधील आमिरचा लुक समोर आला आहे.​ या चित्रपटासाठी आमिरने कान आणि नाक टोचले आहेत.आमिरचा हा हटके लुक पाहिल्यानंतर तुम्ही देखील चकीत व्हाल यात शंकाच नाही.

सोशल मीडियावर आमिरचे या लुक मधील काही फोटो व्हायरल झाले आहेत. चित्रपटात भूमिकेची गरज असल्यानं आमिरनं कान आणि नाक टोचले आहेत. आमिरचा हा आगळा वेगळा लुक समोर आल्यानंतर त्याची भूमिका नक्की काय असेल असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

#AamirKhan ear and nose piercing is painful for #ThugsOfHindostan #AmitabhBachchan #FatimaSanaShaikh #KatrinaKaif https://t.co/hXf8wSqrgg pic.twitter.com/Ba07q7wkZa — bollywoodcrazies (@bollywoodcrazis) June 27, 2017 आमिर खान, अमिताभ बच्चन, फतिमा सना शेख आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असल्यामुळं चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज