अ‍ॅपशहर

सलमान खानमुळे रखडला अभिषेकचा 'लेफ्टी'?

अभिनेता सलमान खानमुळे अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट रखडला असून अजून वर्षभर तरी हा चित्रपट सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. रिपोर्ट्सनुसार अभिषेकचा 'लेफ्टी' हा चित्रपट प्रभूदेवा दिग्दर्शित करणार असून जानेवारी महिन्यातच चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. मात्र प्रभूदेवा सध्या सलमानसोबत 'दबंग ३'मध्ये व्यग्र असल्याने अभिषेकचा चित्रपट पुढे ढकलला गेला आहे.

Maharashtra Times 25 Jul 2017, 2:16 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abhishek bachchans film delayed because of salman khan
सलमान खानमुळे रखडला अभिषेकचा 'लेफ्टी'?


अभिनेता सलमान खानमुळे अभिषेक बच्चनचा आगामी चित्रपट रखडला असून अजून वर्षभर तरी हा चित्रपट सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. रिपोर्ट्सनुसार अभिषेकचा 'लेफ्टी' हा चित्रपट प्रभूदेवा दिग्दर्शित करणार असून जानेवारी महिन्यातच चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. मात्र प्रभूदेवा सध्या सलमानसोबत 'दबंग ३'मध्ये व्यग्र असल्याने अभिषेकचा चित्रपट पुढे ढकलला गेला आहे.

'लेफ्टी'च्या स्क्रीप्टचे बरेचसे काम बाकी आहे. मात्र दबंग-३ चे शूटिंग सुरू असल्याने प्रभूदेवाला नव्या स्क्रीप्टसाठी वेळ नाही. जून २०१८ पर्यंत तरी सलमानच्या चित्रपटाचे काम पूर्ण होणार नसल्याने अभिषेकचा चित्रपट रखडला. या चित्रपटात अभिषेक एका डावखुऱ्या इसमाची भूमिका साकारणार असून संपूर्ण शहराची समस्या सोडवण्याचे जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते. या चित्रपटाशिवाय अभिषेक जे.पी. दत्ता यांच्या युद्धावरील चित्रपटातही झळकणार आहे.

प्रभूदेवाने यापूर्वी 'वाँटेड', 'रावडी राठोड', 'रमैया वस्तावया', 'आर.. राजकुमार', 'अॅक्शन जॅक्सन' असे अनेक हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज