अ‍ॅपशहर

भोळा-भाबडा 'राणा' आता 'व्हिलन' होणार!

आपल्या खास कोल्हापुरी शैलीत 'चालतंय की' म्हणून सगळ्यांच्याच मनात घर केलेला, 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील साधा-भोळा राणादा लवकरच 'व्हिलन' होणार आहे. थांबा थांबा... अहो, मालिकेत नाही हो... 'राणा' म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी आता एका सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.

Maharashtra Times 6 Mar 2017, 1:11 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम actor hardeek joshi in negative role
भोळा-भाबडा 'राणा' आता 'व्हिलन' होणार!


आपल्या खास कोल्हापुरी शैलीत 'चालतंय की' म्हणून सगळ्यांच्याच मनात घर केलेला, 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील साधा-भोळा राणादा लवकरच 'व्हिलन' होणार आहे. थांबा थांबा... अहो, मालिकेत नाही हो... 'राणा' म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी आता एका सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.

राणा-अंजलीची हळवी प्रेमकथा मालिकाप्रेमींना खूपच आवडलीय. त्यात अंजलीचं दिसणं जितकं गोड आहे, तितकंच राणाचं रांगडेपण, भाबडेपण आणि त्याची भाषा सगळ्यांना भावतेय. त्यामुळे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे टीव्हीप्रेमींच्या घरातलेच एक होऊन गेलेत. त्यापैकी हार्दिक लवकरच 'जर्नी प्रेमाची' या मराठी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. पण, हिरो म्हणून नव्हे, तर व्हिलन म्हणून.

हार्दिकच्या देहयष्टीचा विचार करून बहुधा निर्माता-दिग्दर्शकांनी त्यांची निवड व्हिलनच्या भूमिकेसाठी केली असावी. अमोल भाव यांनी हे या सिनेमाचे दिग्दर्शक असून सिनेमाचे संवादही त्यांचेच आहेत. 'जर्नी प्रेमाची' या चित्रपटात हार्दिकसोबत सरस्वती मालिकेतील अभिनेता माधव देवचक्के, अभिषेक सेठिया, काश्मीरा कुलकर्णी हे कलाकार दिसणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज