अ‍ॅपशहर

कॉफीसोबत बरंच काही

आवडत्या सेलिब्रेटींच्या बर्थडे सेलिब्रेशनची उत्सुकता तुम्हालाही असेलच. चला तर दोस्तहो, 'बर्थडे स्पेशल' या नव्या सदरातून त्यांचे वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. आठवणीत राहिलेल्या वाढदिवसांचे गंमतीदार किस्से ते मटाच्या वाचकांशी शेअर करणार आहेत. अदिती सारंगधरने सांगितलेले वाढदिवसाचे किस्से...

Maharashtra Times 16 Oct 2017, 3:40 am
आवडत्या सेलिब्रेटींच्या बर्थडे सेलिब्रेशनची उत्सुकता तुम्हालाही असेलच. चला तर दोस्तहो, 'बर्थडे स्पेशल' या नव्या सदरातून त्यांचे वाढदिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत. आठवणीत राहिलेल्या वाढदिवसांचे गंमतीदार किस्से ते मटाच्या वाचकांशी शेअर करणार आहेत. अदिती सारंगधरने सांगितलेले वाढदिवसाचे किस्से...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aditi sarangdhar birthday
कॉफीसोबत बरंच काही


खरं तर आजवरचे माझे सगळेच वाढदिवस मस्त साजरे करण्यात आले आहेत. त्यातले अनेक रंजक किस्सेही आहेत. आजवर मला सरप्राईज मिळावं यासाठी माझ्या नवऱ्यानं खूप मेहनत घेतली आहे, हे आवर्जून नमूद करेन. 'लक्ष्य' मालिकेच्या वेळी वाढदिवसाच्या आदल्या रात्री अचानक त्यानं 'चल कॉफी प्यायला बाहेर जाऊ', असा हट्ट धरला. मुळात आम्ही डेट करत असताना कॉफीनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अगदी त्यानं मला प्रपोजही कॉफी शॉपमध्येच केलेलं. त्यामुळे त्यासोबत कॉफीला नाही म्हणता येणं अवघड होतं. त्याचाही खूप आग्रह होता. त्यामुळे आम्ही कॅफेत जाऊन बसलो. सुरुवातीला मला काही कळेना तो असं का वागतोय. अखेर पावणेबारा वाजता नवऱ्यानं 'चल आता घरी जाऊ'चा इशारा दिला. काही तरी सरप्राइज असणार, असं वाटलं होतं पण नेमकं काय समजेना.

अंदाजे माझ्या जवळची आणि मालिकेतील २० लोकं घरातल्या स्वयंपाकघर, हॉल, बेडरूम अशा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये लपली होती. त्या सगळ्यांनी मला चक्क 'भौक' करून सरप्राईज दिलं. मी आणि नवरा कॉफी प्यायला गेलो होतो तेव्हा त्यांनी संपूर्ण घर फुगे आणि रंगीत झिरमिळ्यांनी सजवलं होतं. केक कापल्यावर रात्रभर आम्ही सगळ्यांनी पार्टी केली होती. तशीच आणखीन एक अविस्मरणीय बर्थडे पार्टी म्हणजे प्रपोजल नाटक करत असतानाची. आमचा प्रयोग झाल्यावर मी टीमसोबत केक कापला. मला वाटलं झालं असेल सेलिब्रेशन. पण त्यानंतर आम्ही थेट त्या वाशीतल्या नाट्यगृहातच पार्टी केली. कारण टीमची मदत घेऊन नवऱ्यानं सगळं आधीच गुपचूप प्लॅन करून ठेवलं होतं. अर्थातच या सगळ्या अविस्मरणीय आठवणी माझ्यासाठी खूप खास आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज