अ‍ॅपशहर

'न्यूड'चे दिग्दर्शक रवी जाधव कोर्टात

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) 'न्यूड' आणि 'एस दुर्गा' हे दोन चित्रपट केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वगळल्याने त्याचे बॉलिवूडमध्ये पडसाद उमटले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता हे चित्रपट वगळण्यात आल्याने 'एस दुर्गा'चे दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय व इफ्फीच्या विरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली असून 'न्यूड'चे दिग्दर्शक रवी जाधव यांनीही मुंबई उच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.

Maharashtra Times 15 Nov 2017, 9:40 am
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after s durga nude director ravi jadhav plans to move high court
'न्यूड'चे दिग्दर्शक रवी जाधव कोर्टात

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) 'न्यूड' आणि 'एस दुर्गा' हे दोन चित्रपट केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वगळल्याने त्याचे बॉलिवूडमध्ये पडसाद उमटले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता हे चित्रपट वगळण्यात आल्याने 'एस दुर्गा'चे दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय व इफ्फीच्या विरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली असून 'न्यूड'चे दिग्दर्शक रवी जाधव यांनीही मुंबई उच्च न्यायालयात जाऊन दाद मागण्याची तयारी सुरू केली आहे.

येत्या २० नोव्हेंबरपासून इफ्फी महोत्सव सुरू होत आहे. या महोत्सवात रवी जाधव यांचा 'न्यूड' हा मराठी चित्रपट आणि 'एस. दुर्गा' हा मल्याळम चित्रपट दाखविण्यात येणार होता. पण ज्युरींनी कोणतीही पूर्व सूचना न देता हे दोन्ही चित्रपट महोत्सवातून वगळले. त्यामुळे हा महोत्सव वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या पार्श्वभूमीवर ‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमा विभागाचे प्रमुख ज्युरी व चित्रपट निर्माता सुजॉय घोष यांनी ज्युरीपदाचा राजीनामा मंगळवारी दिला. तर ‘एस दुर्गा’चे दिग्दर्शक सनलकुमार शशिधरन यांनी माहिती व प्रसारण मंत्रालय तसेच ‘इफ्फी’च्या अधिका‍ऱ्यांविरोधात केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्या चित्रपटाचा समावेश पुन्हा महोत्सवात करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही ‘एस. दुर्गा’च्या समर्थनार्थ ‌ट्वीट केले आहे. ‘चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. मग आता काय अडचण आहे?’, असा सवाल शहाणे यांनी केला आहे.

रवी जाधव यांनीही सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'मुंबईत न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका स्ट्रगलर महिलेची ही कथा आहे. त्यात वाईट असं काहीच नाही. त्यामुळे हा सिनेमा महोत्सवात दाखवायला हवा होता. सिनेमा वगळण्याचं काही तरी कारण द्यायला हवं होतं. पण काहीच कारण देण्यात आलेलं नाही. हा माझ्यासाठी एक धक्काच असून माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि इफ्फीच्या निर्णयाने मी प्रचंड निराश झालो आहे,' असं जाधव म्हणाले. दरम्यान 'शशिधरन यांच्या पावलावर पाऊल ठेवून मीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर करणार आहे. तिथेच मला महोत्सवातून सिनेमा का वगळला याचं उत्तर मिळेल,' असं जाधव यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज