मुंबई :
सनी देओल, करण कपाडिया यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'ब्लॅन्क' या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता, अक्षय कुमार कॅमियो म्हणजेच एक लहानशी भुमिका करत आहे. अक्षय कुमारचा कॅमियो असणारं 'अली अली' हे गाणं काल, गुरूवारी २५ एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात आलं. 'आपल्याला सगळ्या वाईट प्रवृत्तींपासून देवच वाचवेल, असा संदेश गाण्यात देण्यात आलाय,' असं म्हणत अक्षय कुमारने गाण्याचा व्हिडीओ काल आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला.
या गाण्यात अक्षय कुमारसोबत चित्रपटात मुख्य भूमिका करणारा करण कपाडिया सुद्धा दिसणार आहे. गाण्याचा सेटही मोठा दिमाखदार दिसत आहे. शिवाय बॅकग्राउंड डान्सर्सच्या अदबशीर थिरकण्यामुळे गाणं आणखीनच रंगतदार झालं आहे.