अ‍ॅपशहर

आलिया भट्टनं खरेदी केली 'ही' शानदार कार

बॉलिवूडची 'शानदार' अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या चित्रपटामुळं चर्चेत नसून तिनं खरेदी केलेल्या महागड्या कारमुळं चर्चेत आहे. तिनं रेंज रोव्हर कंपनीची 'वोग' ही एसयूव्ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल १ कोटी ८८ लाख आहे.

Maharashtra Times 24 Nov 2017, 3:21 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alia bhatt buys luxury range rover vogue car
आलिया भट्टनं खरेदी केली 'ही' शानदार कार


बॉलिवूडची 'शानदार' अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या चित्रपटामुळं चर्चेत नसून तिनं खरेदी केलेल्या महागड्या कारमुळं चर्चेत आहे. तिनं रेंज रोव्हर कंपनीची 'वोग' ही एसयूव्ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल १ कोटी ८८ लाख आहे.

ही नवी कोरी गाडी घरी येण्याआधी आलिया ऑडी 'क्यू ५' ही कार वापरत होती. आलियाला महागड्या गाड्य़ांची आवड असून तिच्याकडं अशा अनेक अालिशान गाड्या आहेत. आलियानं खरेदी केलेली रेंज रोव्हर एसयूवी अभिनेता रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्याकडे देखील आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्री मलायका अरोरानं देखील ही कार घेतली आहे.

या कारची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मूड लाइटिंग, ऑडियो सिस्टम,अॅडजस्ट करता येणारी लेदर सीट तसचे क्लाइमेट कंट्रोल अशा सुविधा या कारमध्ये आहेत. या शिवाय या कारमध्ये १० इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली असून या कारची टॉप स्पीड २१० Kmph आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज