अ‍ॅपशहर

alia bhatt: आलियाची ड्रायव्हर-हेल्परला भेट; दिला ५० लाखांचा चेक

बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपटांवर आपलं नाव कोरणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. तिच्या अभिनयानं तिनं अनेकांची मनं जिंकलीच आहेत, आता तिनं खासगी आयुष्यात केलेल्या एका गोष्टीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. आलियाने वाढदिवसाच्या दिवशी तिच्या ड्रायव्हर आणि हेल्परला प्रत्येकी ५० लाखांचा चेक भेट दिला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Mar 2019, 3:55 pm
मुंबई:

बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपटांवर आपलं नाव कोरणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. तिच्या अभिनयानं तिनं अनेकांची मनं जिंकलीच आहेत, आता तिनं खासगी आयुष्यात केलेल्या एका गोष्टीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. आलियाने वाढदिवसाच्या दिवशी तिच्या ड्रायव्हर आणि हेल्परला प्रत्येकी ५० लाखांचा चेक भेट दिला.

आलियाच्या आयुष्यात तिच्या कुटुंबातील सदस्यांनंतर ही दोन माणसं अतिशय महत्त्वाची आहे अशी कायम चर्चा असते. तिचा ड्रायव्हर सुनील आणि हेल्पर अमोल तिच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात. आलियाच्या बॉलिवूडमधील पदार्पणापासून ते तिच्या सोबत आहेत. त्यामुळे या दोघांचेही आभार मानण्यासाठी आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी आलियानं त्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा चेक तिच्या वाढदिवसाला दिला आहे. सुनील आणि अमोलनं मुंबईत घरं घ्यावीत अशी तिची इच्छा आहे. आलियानं दिलेल्या या भेटीमुळे या दोघांनीही मुंबई १ BHK चं घर विकत घेतल्याची चर्चा आहे.

आलियाचे अनेक चाहते तिनं दाखवलेल्या माणुसकीमुळे भावुक झाले आहेत. सोशल मीडियावरही आलियावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज