मुंबई:
आलिया भट्टच्या अभिनयानं नटलेल्या 'राझी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'ऐ वतन' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आज 'दिलबरो' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
प्रसिद्ध सूफी गायिका हर्षदीप कौर यांच्या आवाजातील हे हृदयस्पर्शी गाणं बाप-लेकीच्या नात्याला समर्पित करण्यात आलं आहे. काश्मिरी शब्दांनी सुरुवात होणारं हे गाणं अत्यंत भावनिक आहे. आलिया भट्ट अर्थात, सेहमतची लग्नानंतर पाकिस्तानात पाठवणी होत असताना हे गाणं चित्रीत करण्यात आलंय. चित्रपटात आलिया पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची (विकी कौशल) पत्नी आणि भारतीय गुप्तहेर अशी आव्हानात्मक भूमिका साकारतेय.
शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं ज्येष्ठ कवी, गीतकार गुलजार यांनी लिहिलंय. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रोडक्शन निर्मित हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला असून विनीत जैन, करण जोहर, हिरू यश जोहर आणि अपूर्व मेहता हे चित्रपटाचे निर्माते आहेत.