अ‍ॅपशहर

‘ब्रिक्स’मध्ये आलोक सर्वोत्कृष्ट

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या ब्रिक्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कासव’ या सिनेमातील भूमिकेसाठी अभिनेता आलोक राजवाडे याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी मिळून सुरू केलेल्या या महोत्सवाचं हे दुसरंच वर्ष होतं.

Maharashtra Times 11 Jul 2017, 8:56 am
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या ब्रिक्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कासव’ या सिनेमातील भूमिकेसाठी अभिनेता आलोक राजवाडे याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी मिळून सुरू केलेल्या या महोत्सवाचं हे दुसरंच वर्ष होतं. यात प्रथमच एका भारतीय अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे आणि तो अभिनेता पुण्यातील मराठी कलाकार आलोक असावा, ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असल्याचं आलोकच्या फेसबुक पोस्ट्सवरूनही दिसून येतं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम alok rajwade won best actor for his role in kaasav turtle
‘ब्रिक्स’मध्ये आलोक सर्वोत्कृष्ट


‘कासव’ सिनेमाची सुरुवातच एक मुलगा आत्महत्या करायला निघाला आहे, इथून होते. चीनमध्येही लोकांना हा विषय आपलासा वाटला; त्यामुळे ही जगभरातील किती गंभीर समस्या आहे, हे या महोत्सवाच्या निमित्तानं लक्षात आल्याचं आलोकनं सांगितलं.

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित, राष्ट्रीय पुरस्कार विजेता (सुवर्णकमळ) ठरलेल्या ‘कासव’ या सिनेमासाठी ‘ब्रिक्स’चाही पुरस्कार मिळाल्याबद्दलची भावना व्यक्त करताना आलोक म्हणाला, ‘या सिनेमात नेहमीसारखी गोष्ट सांगितली गेलेली नाही. यात काही नाट्य घडत नाही. हा सिनेमा म्हणजे एखाद्या अभिनेत्याचा प्रवासही नाही. पुरस्काराच्या निमित्तानं अशा प्रकारच्या वेगळ्या सिनेमांचीही दखल घेतली जाते आणि सिनेमाबद्दलची उत्सुकताही वाढते. यासाठी हे पुरस्कार महत्त्वाचे आहेत.’

सातत्यानं एकाच पद्धतीचे सिनेमे तयार होत राहणं हे फिल्ममेकर्सप्रमाणेच प्रेक्षक म्हणूनही आपल्यासाठी फायद्याचं नसल्याचं आलोकचं मत आहे. चीनमधील छंगदू शहरात झालेल्या ब्रिक्स महोत्सवातील आलोकच्या या पुरस्कारामुळे ‘कासव’ प्रदर्शित होण्याची आशा वाढली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज