अ‍ॅपशहर

बिग बींनी फेडले २,१०० शेतकऱ्यांचे कर्ज

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंय. या शेतकऱ्यांचं कर्ज फेडल्याची माहिती स्वत: अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2019, 11:15 am

मुंबई:

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंय. या शेतकऱ्यांचं कर्ज फेडल्याची माहिती स्वत: अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या बिग बींनी ही बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना लिहिलं आहे की, 'मी दिलेलं वचन पूर्ण केलं. बिहारमधील २,१०० कर्जबाजारी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आणि वन टाइम सेटलमेंट (OTS) माध्यमातून त्यांची सर्व थकबाकी फेडण्यात आली. याशिवाय, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही त्यांनी अर्थसहाय्य केलंय. त्यांना मुंबईत बोलावून श्वेता आणि अभिषेकने धनादेशही दिले. ' असंही त्यांनी सांगितलं.

अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांची कर्ज फेडली होती. आता त्यांनी बिहारमधील काही शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज