अ‍ॅपशहर

'पद्मावती'चा ट्रेलर पाहून अमिताभ भारावले!

डोळे दिपवणारे भव्यदिव्य सेट्स, अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील भयावह रणवीर सिंग आणि काळजाला भिडणारे संवाद... या सगळ्याचा सुंदर मिलाप असलेल्या 'पद्मावती'च्या ट्रेलरनं सध्या चित्रपटरसिकांवर गारुड केलं आहे. 'पद्मावती'च्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही 'पद्मावती'च्या ट्रेलरचं आणि संजय लीला भन्साळींच्या कलागुणांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Maharashtra Times 11 Oct 2017, 1:23 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amitabh bachchan praises sanjay leela bhansali for padmawati
'पद्मावती'चा ट्रेलर पाहून अमिताभ भारावले!

डोळे दिपवणारे भव्यदिव्य सेट्स, अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील भयावह रणवीर सिंग आणि काळजाला भिडणारे संवाद... या सगळ्याचा सुंदर मिलाप असलेल्या 'पद्मावती'च्या ट्रेलरनं सध्या चित्रपटरसिकांवर गारुड केलं आहे. 'पद्मावती'च्या ट्रेलरचं सर्वत्र कौतुक होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही 'पद्मावती'च्या ट्रेलरचं आणि संजय लीला भन्साळींच्या कलागुणांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

'पद्मावती'चा ट्रेलर पाहून भारावलेल्या अमिताभ यांनी एक ट्विट केलं आहे. 'त्याला हे कसं काय जमतं?... संजय लीला भन्साळी. पद्मावती आणि ट्रेलर! या माणसाला विलक्षण दृष्टी लाभलीय. वरदानच मिळालंय.' असं अमिताभ यांनी म्हटलं आहे.
T 2573 - HOW DOES HE DO THIS ..?? Sanjay Leela Bhansali, 'Padmavati' and the trailer .. the gift of extraordinary vision !👏👏👏👏🙏🙏 pic.twitter.com/9UvVzEqO3Y — Amitabh Bachchan (@SrBachchan) 9 October 2017
महाराणी 'पद्मिनी' यांच्या जीवनावर आधारित 'पद्मावती' येत्या १ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोननं यात राणी पद्मिनीची भूमिका साकारली आहे. शाहीद कपूर राजा रतनसिंहच्या भूमिकेत असून रणवीर सिंहनं अल्लाउद्दीन खिलजी हा क्रूर शासक पडद्यावर जिवंत केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज