अ‍ॅपशहर

छोट्या पडद्यावरही अमिताभच 'महानायक'

वयाच्या पंच्याहत्तरीतही सिनेमाचा पडदा गाजविणारे महानायक अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावरही 'बिग बॉस' ठरले आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत सलमान खान व अक्षय कुमारच्या रिअॅलिटी शोला धोबीपछाड देत 'बिग बीं'च्या कौन बनेगा करोडपतीनं बाजी मारली आहे.

Maharashtra Times 15 Oct 2017, 3:01 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amitabh bachchans kbc beats salmans bigg boss in trp race
छोट्या पडद्यावरही अमिताभच 'महानायक'


वयाच्या पंच्याहत्तरीतही सिनेमाचा पडदा गाजविणारे महानायक अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावरही 'बिग बॉस' ठरले आहेत. टीआरपीच्या स्पर्धेत सलमान खान व अक्षय कुमारच्या रिअॅलिटी शोला धोबीपछाड देत 'बिग बीं'च्या कौन बनेगा करोडपतीनं बाजी मारली आहे.

टीव्ही रिअॅलिटी शोचे मापदंड बदलून टाकणाऱ्या कौन बनेगा करोडपतीचा नववा सीझन सध्या सुरू आहे. त्याचवेळी, सलमान खान बिग बॉस ११ वा सीझन गाजवतोय, तर खिलाडी अक्षय कुमार 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' देखील दर्शकांना पोटभर हसवतोय. हे तिन्ही शो हिट जात असले तरी 'कौन बनेगा करोडपती ९' गेल्या अनेक आठवड्यांपासून टीआरपी चार्टवर अव्वल आहे.

'कौन बनेगा करोडपती'चा नवा सीझन सुरू झाल्यापासूनच शोचा टीआरपी सतत वाढता राहिला आहे. ‘केबीसी’ची या सीझनची पहिली कोट्यधीश अनामिका मजुमदार हिच्या एपिसोडच्या वेळी तर ‘टीआरपी’ने उच्चांक गाठला होता. सलमान आणि अक्षयच्या शोमुळं 'केबीसी'च्या टीआरपीचे गणित डळमळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, 'बार्क'ने दिलेल्या ४०व्या आठवड्याच्या रेटिंगमध्येदेखील 'कौन बनेगा करोडपती ९' नं बाजी मारलीयं.

येत्या काही दिवसांत शाहरूख खान 'टेड टॉक्स इंडिया - नई सोच' नावाचा शो घेऊन या स्पर्धेत उतरणार आहे. शाहरुखच्या आगमनानंतर टीआरपीची ही स्पर्धा अधिक रंगतदार होईल, अशी शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज