अ‍ॅपशहर

सलमान खानच्या बॉडीगार्डवर FIR दाखल

अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड गुरमीत सिंह उर्फ शेरा याच्याविरुद्ध एका महिलेला सामूहिक बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिलेनं खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Maharashtra Times 21 Oct 2017, 10:55 pm
मटा ऑनलाइन वृत्त | मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम an fir has been filed against salman khans bodyguard shera
सलमान खानच्या बॉडीगार्डवर FIR दाखल


अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड गुरमीत सिंह उर्फ शेरा याच्याविरुद्ध एका महिलेला सामूहिक बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिलेनं खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

गुरमीत सिंहनं महिलेला 'जुबेर' प्रकरणात मांडवली करण्यास सांगितलं होतं. मात्र महिलेनं तस न केल्यामुळे शेरानं महिलेला सामूहिक बलात्काराची धमकी दिली असा शेरावर आरोप आहे. मात्र शेरानं हा आरोप निराधार आहे असं सांगत, 'मी त्या महिलेशी कधी चर्चा केली नाही. मला माहितही नाही ती महिला कोण आहे', असं सांगितलं.

गुरमीत सिंह उर्फ शेरावर या आधीही लोकांना बंदूकीच्या जोरावर धमकवण्याचे आरोप करण्यात आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज