अ‍ॅपशहर

ती मुलगी माझी नाही; अनुराधा पौडवाल यांनी फेटाळला दावा

केरळमध्ये राहणाऱ्या करमाला मोडेक्स या महिलेने सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांची कन्या असल्याचा दावा केला होता. आपण अनुराधा पौडवालची मुलगी आहोत हे सिद्ध करण्यासाठी महिलेनं कोर्टात याचिका दाखल केली असून मालमत्तेत हिस्सा आणि ५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. या सगळ्या प्रकरणावर अनुराधा यांनी मौन सोडले असून त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2020, 4:55 pm
मुंबईः केरळमध्ये राहणाऱ्या करमाला मोडेक्स या महिलेने सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांची कन्या असल्याचा दावा केला होता. आपण अनुराधा पौडवालची मुलगी आहोत हे सिद्ध करण्यासाठी महिलेनं कोर्टात याचिका दाखल केली असून मालमत्तेत हिस्सा आणि ५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. या सगळ्या प्रकरणावर अनुराधा यांनी मौन सोडले असून त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anuradha


करमाला मोडेक्सने कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर २७ जानेवारीला अनुराधा पौडवाल यांना त्यांच्या दोन्ही मुलांसह न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यादरम्यान अनुराधा यांनी मोडेक्सनं केलेल्या दाव्यात काहीच तथ्य नसून ते निरर्थक आहेत. असं म्हटलं आहे. याप्रकरणामुळं माझी प्रतिमा मलीन झाली आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

'मी अनुराधा पौडवालची कन्या; संपत्तीत हिस्सा हवा'

'अनुराधा यांच्या मुलीचा जन्म १९७४मध्ये झाला होता. त्यामुळं त्या महिलेनं केलेले दावे खोटे आहेत. तसंच, या महिलेनं याचिकेत अनुराधा यांच्या पतीचाही उल्लेख केला आहे. मात्र, त्यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. जर ती खरंच त्यांची मुलगी असेल तर तिनं अनुराधा यांना पैसे द्यावेत.' अशी माहिती अनुराधा पौडवाल यांच्या प्रवक्त्यांनी दिली.

'मला कोणाची मानहानी करायची नाहीये, मला फक्त सत्य शोधायचं आहे. जेव्हापासून मला माझ्या आईबद्दल समजलं आहे तेव्हापासून मी प्रयत्न करतेय आणि माझ्या या प्रयत्नात माझे कुटुंब माझ्यासोबत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मला कळालं की त्यांच्या एका मुलीचं निधन झालं. तेव्हापासून मी आईला भेटण्यासाठी धडपडतेय मात्र त्यात यश आलं नाही. शेवटी मी त्यांना फोन करण्याचा निर्णय घेतला. मात्र बऱ्याचदा फोन करुनही त्यांनी काहीच प्रतिसाद नाही दिला. उलट त्यांनी माझा नंबर ब्लॉक केला. म्हणूनचं मी हे प्रकरण कायदेशीररित्या सोडवण्याचा निर्णय घेतला.' असं करमाला मोडेक्स यांनी सांगितलं. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज