अ‍ॅपशहर

राहुल द्रविड माझं पहिलं प्रेम होतं!: अनुष्का शेट्टी

'बाहुबली'तील देवसेनेच्या भूमिकेमुळं देशभरात पोहोचलेली दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या सौंदर्यानं अनेक तरुणांना घायाळ केलं आहे. पण अनुष्का शेट्टीचं मन दुसऱ्याच कुणावर तरी जडलंय. तो म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, जंटलमन खेळाडू राहुल द्रविड. 'माझं पहिलं प्रेम राहुल द्रविड हेच होतं,' असा गौप्यस्फोट तिनं केला आहे.

Maharashtra Times 9 Nov 2017, 12:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anusha shetty said she has crush on rahul dravid
राहुल द्रविड माझं पहिलं प्रेम होतं!: अनुष्का शेट्टी

'बाहुबली'तील देवसेनेच्या भूमिकेमुळं देशभरात पोहोचलेली दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या सौंदर्यानं अनेक तरुणांना घायाळ केलं आहे. पण अनुष्का शेट्टीचं मन दुसऱ्याच कुणावर तरी जडलंय. तो म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, जंटलमन खेळाडू राहुल द्रविड. 'माझं पहिलं प्रेम राहुल द्रविड हेच होतं,' असा गौप्यस्फोट तिनं केला आहे.

एका तामीळ पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिनं ही 'मन की बात' सांगितलीय. 'राहुल द्रविड हा माझा सर्वात आवडता क्रिकेटर आहे. एकेकाळी राहुल माझा क्रश होता. तो मला खूप आवडायचा. एका टप्प्यावर तर मी त्याच्या प्रेमात पडले होते,' असं अनुष्का म्हणाली.

'बाहुबली'मध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रभासशी सध्या अनुष्काचं अफेअर असल्याची चर्चा आहे. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार असल्याचंही बोललं जात आहे. अर्थात, दोघांनीही अद्याप यास दुजोरा दिलेला नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज