अ‍ॅपशहर

हिंदी गाण्यासाठी प्रेक्षकांनी रेहमानचा शो सोडला

ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए.आर.रेहमानला प्रेक्षकांच्या प्रचंड नाराजीचा सामना करावा लागला आहे. एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये रेहमानने हिंदी गाणी कमी गायल्याने त्याच्यावर प्रेक्षक नाराज झाले आणि ते लाइव्ह कॉन्सर्ट सुरू असतानाच उठून गेले. पहिल्यांदाच लाइव्ह कॉन्सर्टमधून प्रेक्षक उठून गेल्याने कार्यक्रमाचे आयोजकही थोडावेळ भांबावून गेले होते.

Maharashtra Times 15 Jul 2017, 11:54 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ar rahmans wembley concert controversy as fans goes out of netru indru nalai
हिंदी गाण्यासाठी प्रेक्षकांनी रेहमानचा शो सोडला

ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए.आर.रेहमानला प्रेक्षकांच्या प्रचंड नाराजीचा सामना करावा लागला आहे. एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये रेहमानने हिंदी गाणी कमी गायल्याने त्याच्यावर प्रेक्षक नाराज झाले आणि ते लाइव्ह कॉन्सर्ट सुरू असतानाच उठून गेले. पहिल्यांदाच लाइव्ह कॉन्सर्टमधून प्रेक्षक उठून गेल्याने कार्यक्रमाचे आयोजकही थोडावेळ भांबावून गेले होते.

लंडनमध्ये वेंबली एरिनामध्ये रहमानचा शो सुरू होता. या शोमध्ये त्याने एकूण २८ गाणी गायली. त्यात १६ हिंदी आणि १२ तमिळ गाण्यांचा समावेश होता. रेहमानने हिंदी गाणी अत्यंत कमी गायल्याचं सांगत रागावलेले प्रेक्षक लाइव्ह कॉन्सर्टमधून बाहेर पडले. त्यानंतर त्याच्या या नाराज चाहत्यांनी टि्वटरवरून आपला राग व्यक्त केला. त्यामुळे रेहमानचे तामिळ चाहते भडकले आणि त्यांनी रेहमानची बाजू घेत ट्रोलिंग सुरू केली. परिणामी टि्वटरवर रहमानच्या चाहत्यांमध्येच दोन गट पडले. दरम्यान, रेहमानने या संपूर्ण प्रकरणावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतू लंडनमध्ये त्याचा शो पाहण्यासाठी आलेले उत्तर भारतीयांमध्ये प्रचंड नाराजी होती.

७ वर्षानंतर लाइव्ह शो

तब्बल सात वर्षानंतरच्या दीर्घ विश्रांतीनंतरचा रेहमानचा हा लाइव्ह शो होता. 'रोजा' सिनेमाच्या डेब्यूला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा शो आयोजित करण्यात आला होता. बेनी दयाल, जावेद अली, नीती मोहन, हरिचरण, जोनिता गांधी आणि रंजीता बरोट आदी गायक या शोमध्ये सहभागी झाले होते. या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये रेहमानचीच बॉलिवूडमधील गाणी जास्तीत जास्त होतील असं त्याच्या चाहत्यांना वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी या कॉन्सर्टला मोठी गर्दी केली होती. 'नेतरू इंद्रू नलाई' म्हणजे 'काल, आज आणि उद्या' या टायटल खाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या शोमध्ये त्यांनी हिंदीच्या खालोखाल तमिळ गाणी गायली. ते प्रेक्षकांना रुचलं नाही, त्यामुळे त्यांनी शोमधून बाहेर पडणंच पसंत केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज