अ‍ॅपशहर

लालटेनः लालू प्रसाद यादव यांच्यावर बायोपिक

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या जीवनावर लवकरच बायोपिक काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटांनंतर आता लालू प्रसाद यादव यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Oct 2019, 9:29 pm
नवी दिल्लीः बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या जीवनावर लवकरच बायोपिक काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटांनंतर आता लालू प्रसाद यादव यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lalu Prasad yadav


लालू प्रसाद यादव यांच्या बायोपिकचे नाव 'लालटेन' असणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या चिन्हावर या बायोपिकचे नाव आधारलेले आहे. भोजपुरी अभिनेते आणि गायक यश कुमार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तर, लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांची भूमिका भोजपुरी अभिनेत्री स्मृति सिन्हा साकारणार आहेत. लालटेन चित्रपटाचे चित्रिकरण बिहार आणि गुजरातमधील विविध ठिकाणी होणार आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल, असे सांगितले जात आहे.

लालू प्रसाद यादव यांनी अनेक दिग्गजांना राजकारणात धूळ चारली आहे. बोलण्याचा हटके अंदाज त्यांचे वेगळेपण दाखवून देणारा आहे. मूरलेले राजकारणी म्हणून लालू प्रसाद यांची ओळख आहे. लालू प्रसाद यादव यांच्या जीवनातील काही प्रसंग यात दाखवण्यात येणार आहेत. या बायोपिकमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या वादग्रस्त प्रकरणांवर उघडपणे भाष्य करण्यात येणार असल्याचे समजते. लालू प्रसाद यांची पत्नी राबडी देवी यादेखील माजी मुख्यमंत्री होत्या. त्यांचेही जीवन या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले यश गोंडा या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. दिलदार सांवरिया चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते. यानंतर इच्छाधारी, रुद्र, लुटेरे आणि दरिया यांसारखे यशस्वी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. यावर्षी प्रदर्शित झालेला परवरिश चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला.

लालू यादव यांना झटका, ३.७ कोटींची बेनामी संपत्ती जप्त होणार

दरम्यान, चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव सध्या कारागृहात आहेत. प्रकृतीचे कारण पुढे करून लालू प्रसाद यादव यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला. लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातील ४ प्रकरणांत दोषी आढळले असून, त्यांना १६८ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यासह पत्नी राबडी देवी, पुत्र तेजस्वी आणि तेज प्रताप यादव आणि मुलगी मीसा भारती यांच्यावरही भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लालूप्रसाद यादव यांचा जामीन अर्ज फेटाळला

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज