अ‍ॅपशहर

हा तर निव्वळ मूर्खपणा; कडक निर्बंधावर प्रसिद्ध अभिनेत्याची सणसणीत पोस्ट

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी म्हणून सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. निर्बंधांच्या नावाखाली पुन्हा लॉकडाउनसारखीच परिस्थिती असून, त्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2021, 5:10 pm
मुंबई: करोना प्रतिबंधक उपाययोजनांसदर्भात राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. दिवसा जमावबंदी आणि सायंकाळी सहानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. कडक निर्बंध लागू केल्यानंतर सामान्य नागरिक तसंच व्यापारी वर्गाने याला विरोध करत संताप व्यक्त केलाय. इतकंच नाही तर हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता करण पटेल यानं देखील प्रशासकीय यंत्रणेवर टीका केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम करण पटेल


करणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे. अभिनेते त्याचं काम करू शकतात, क्रिकेटचे सामनेही दिवस-रात्र खेळता येणार. राजकीय नेते निवडणुकीच्या सार्वजनीक प्रचार सभा घेऊ शकतात. घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं जातं. परंतु सामान्य माणूस त्याच्या कामाला जाऊ शकत नाही', असं करणनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

करणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक कलाकरांनी देखील त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर करणच्या चाहत्यांनी ही पोस्ट शेअर केल्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे. सामान्य व्यक्तीचा विचार करणारा कलाकार आहेस, असं त्याच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज