अ‍ॅपशहर

ही नवी नग्नता आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो शेअर करत प्रकाश राज यांनी मारला टोमणा

Prakash Raj Tweet: अभिनेते प्रकाश राज यांचे एक ट्वीट सध्या चर्चेत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कपड्यांच्या स्टाइलविषयी ट्वीट करत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Authored byजान्हवी भाटकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2022, 7:09 pm
मुंबई: दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेमांमधून लोकप्रियता मिळवणारे लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. मात्र त्यांना अनेकदा अशा विधानांमुळे अडचणीत यावं लागतं. सरकारवर ताशेरे ओढणारी त्यांची विविध विधानं अनेकदा चर्चेत आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकार यावर प्रकाश राज यांनी अनेकदा टीका केली आहे. आता त्यांनी आणखी एक ट्वीट करत पंतप्रधानांवर शेलकी टीका केली आहे. त्यांनी पीएम मोदींचे काही फोटो शेअर करत त्यांना टोमणा मारला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Prakash Raj On PM Narendra Modi


प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या फोटोनंतर मात्र तेच टीकेचे धनी झाले आहेत. प्रकाश राज यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जातेय. पंतप्रधानांबाबत अशी भाषा शोभत नाही अशा आशयाच्या कमेंट्स करत नेटिझन्स त्यांना सुनावत आहेत.

हे वाचा-आर्यन खान ड्रग केसविरोधात हिंदू महासंघाची याचिका, चढावी लागणार कोर्टाची पायरी?

काय म्हणाले प्रकाश राज?

प्रकाश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो शेअर केला आहे. मोदींच्या विविध फोटोंचं एक कोलाज त्यांनी शेअर केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सभांच्या ठिकाणी परिधान केलेल्या पगडी-फेट्यांमधील फोटो दिसत आहेत. पंतप्रधान मोदी अनेकदा वेगवेगळी पारंपारीक वेशभुषा करताना दिसतात. सभा किंवा दौरा असणाऱ्या ठिकाणाच्या परंपरेनुसार त्यांची वेशभुषा असते. याच फोटोंचे कोलाज अभिनेत्याने शेअर केले आहे. त्यांनी हे कोलाज शेअर करताना असे म्हटले आहे की, ओव्हरड्रेसिंग ही एक प्रकारची नवी नग्नता आहे का?


प्रकाश राज यांच्या ट्वीटवर युजर्सनी कमेंट करत त्यांना ट्रोल केले आहे. त्यांच्या सिनेमातील विनोदी फोटो शेअर करत नेटिझन्स त्यांना ट्रोल करतायंत. प्रकाश राज काहीही बोलत असल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींचे फोटो शेअर करत 'न्युडिटी' हा शब्द वापरल्याने प्रकाश राज यांच्या ट्वीटवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

हे वाचा-महिलांनाही मिळावा एकापेक्षा जास्त पती असण्याचा हक्क; काय बोलून गेले जावेद अख्तर?

दरम्यान ही पहिलीच वेळ नव्हे जेव्हा प्रकाश राज नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. याआधी रविवारीच एक ट्वीट केले होते ज्यात त्यांनी भ्रष्टाचाराविषयी भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ शेअर करत सर्वत्र भ्रष्टाचार असल्याचे ते म्हणाले होते.


दरम्यान प्रकाश राज यांचं ट्विटर अकाउंट या ना त्या ट्वीटमुळे अनेकदा चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी 'द कश्मीर फाइल्स' सिनेमावर एक ट्वीट केलं होतं. गोव्यात पार पडलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे ज्युरी नदाव लॅपिड यांनी सिनेमावर नकारात्मक टिप्पणी केल्यानंतर प्रकाश राज यांचेही ट्वीट व्हायरल झाले होते.
लेखकाबद्दल
जान्हवी भाटकर
जान्हवी भाटकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. डिजिटल आणि टेलिव्हिजन मीडियामध्ये ५ वर्षांचा अनुभव. 'न्यूज १८ लोकमत'मधून डिजिटल मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात. ऑनलाइन माध्यमांमध्ये ३ वर्ष कार्यरत. मनोरंजन, लाइफस्टाइल आणि अर्थ विषयात आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख