अ‍ॅपशहर

असा भंगार ड्रेस कोण घालतं ?, कान्स फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायच्या लूकला युजर्सची नापसंती

Aishwarya rai on cannes red carpet- गेल्या 21 वर्षांपासून ऐश्वर्या राय बच्चन कान्सच्या रेड कार्पेटवर सहभागी होत आहे. यंदाच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चन आधी हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली, आणि त्यानंतर तिने हुड असलेल्या गाऊन परिधान केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2023, 8:40 am
मुंबई- कान्स फेस्टिव्हल म्हटलं की बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंतच्या दिग्गज सेलिब्रेटींचे वेगवेगळे अनोख लूक पाहायची संधी मिळते. यावर्षी अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, मृणाल ठाकूर यांसारख्या अभिनेत्रींनी कान्स फिल्म फेस्टिव्हलला पदार्पण केले आहे. भारतातून कित्येक अभिनेत्री या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असतात. पण सर्वांच्या उत्सुकता असते ती सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चनच्या लूकची.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aishwarya rai bachchan

दिशा परमार आणि राहुल वैद्य होणार आई बाबा, खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूड
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचे हे २१ वे वर्ष आहे. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर ती आता नवीन राहिलेली नाही. या फेस्टिव्हलमध्ये नुकताच एक मजेशीर किस्सा घडला. गुरुवारी 2023 च्या कान्स रेड कार्पेटवर एका फ्रेंच फोटोग्राफरने उर्वशी रौतेलाला चुकून ऐश्वर्या समजले. दुसरीकडे, अॅशने यंदाच्या आपल्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ऐश्वर्याच्या गाऊनमध्ये दिसलेल्या हुडीबद्दल लोक विविध कमेंट करताना दिसत आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन या बुधवारी कान्स २०२३ मध्ये पोहोचली. इंडियाना जोन्स आणि द डायल ऑफ डेस्टिनीच्या स्क्रीनिंग दरम्यान गुरुवारी रात्री रेड कार्पेटवर ऐश्वर्या अनोख्या स्टाईलमध्ये दिसली, तिच्या लूकची सध्या खूप चर्चा होत आहे.

रेड कार्पेटवर ग्रीन आउटफिट

ऐश्वर्या पहिल्याच दिवशी रेड कार्पेटवर हिरव्या रंगाच्या पोशाखात दिसली. तेव्हा तिच्या लूकचे खूप कौतुक झाले. आता आणखी एक नवा लूक समोर आला आहे ज्यामध्ये ऐश्वर्याने गाऊनसोबतच डोक्यापर्यंत हुडी जोडली आहे. तिचा हा लूक बहुतेकांना पसंत पडलेला नाही.

लोकांनी ऐश्वर्याच्या ड्रेसची खिल्ली उडवली

काही लोकांनी कमेंट करत म्हटले की - तिने स्वयंपाकघरातून अॅल्युमिनियम फॉइल उचलून घातली होती का? तर, काहींनी म्हटले आहे - तुम्ही असा भंगार ड्रेस कधी पाहिला आहे का?. मात्र ऐश्वर्याचे चाहते तिला कान्सची क्विन म्हणत आहे. ऐश्वर्या राय बच्चन २००२ पासून या चित्रपट महोत्सवाचा भाग घेते. ऐश्वर्यासोबत तिची ११ वर्षांची मुलगी आराध्यासुद्धा आली आहे.

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री रेड कार्पेटवर पोहोचल्या

यंदा कान्स फिल्म फेस्टिव्हल १६ मे ते २७ मे पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर आतापर्यंत सारा अली खान, मृणाल ठाकूर, उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी दिसले आहेत.

महत्वाचे लेख