अ‍ॅपशहर

बनवाबनवीमध्ये कोणाला घ्यायचं यावर माझं दुमत होतं,पण...सचिन पिळगांवकरांनी सांगितला तो किस्सा

34 Years of Ashi Hi Banwa Banwi:‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटानं धनंजय माने हे नाव मराठी माणसाच्या मनात रुजवलं. तसं हे नाव अनेक जणांचं; पण आज धनंजय माने म्हटलं, की अशोक सराफ आणि दार ठोठावणारे लक्ष्मीकांत बेर्डे हे दोन कलावंत डोळ्यापुढे उभे राहतात. त्याबरोबर आठवतं इस्राईलवरून येणारं, ७० रुपये किंमत असलेलं डायबेटिसवरचं औषध! या विषयावरचे अनेक मीम्स विविध प्रसंगी तयार होतात आणि फॉर्वर्डही होतात

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Sep 2022, 12:44 pm
मुंबई: ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाचं नाव घेतलं तरी दिग्गज कलाकारांची फौज डोळ्यापुढं उभा राहते. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर, सुधीर जोशी, विजू गोखले, जयराम कुलकर्णी, सुहास भालेकर, नयनतारा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटानं गेली ३४ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ashi hi banwa banwi marathi film

जिंकलंस मित्रा! सुनील पाल यांनी राखलं परिस्थितीचं भान, VIDEO होतोय प्रचंड व्हायरल
दर्जेदार चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान एक काळ असा होता ज्यावेळी मराठी सिनेमांनी लोटपोट हसवलं, रडवलं, प्रेमात पडायला लावलं आणि गाण्यांवर थिरकायला लावलं. या साऱ्या भावनांची सरमिसळ 'अशी ही बनवाबनवी'हा चित्रपट आहे असं नक्कीच म्हणता येईल. आजही हा चित्रपट टीव्हीवर दर आठवड्याला पाहिला जोता. इतकंच नव्हे तर तरुणमंडळी ओटीटीवर हा चित्रपट पाहाताना दिसतात. मीम्सचा तर पाऊस पडतो. अशा या चित्रपटाविषयीचा एक खास किस्सा अभिनेते आणि या चित्रपटाचे सचिन पिळगांवकर यांनी एका मुलाखतीत शेअर केला होता.
त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं? सुष्मिता सेनच्या भावानं बदलला घटस्फोटाचा निर्णय
काय आहे हा किस्सा?'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाच्या आधी माझे आणि व्ही. शांताराम (अण्णा) यांचे काही मतभेद झाले होते. माझं मत विचारात घेतलं जाणार नसेल तर मी काम करणार नाही असं मी स्पष्ट सांगून टाकलं. अण्णांनी मला पुन्हा एकदा बोलावलं. किती प्रमुख कलाकार घ्यायचे आणि त्या भूमिका कोणाला द्यायच्या यावर आमचं दुमत होतं. अण्णांनी माझं ऐकून घेतलं आणि मला हवं तसं करण्याचं स्वातंत्र्य दिलं. दिग्दर्शकावर कोणत्याही प्रकारे दबाव न टाकता त्याला हवा तसा चित्रपट साकारण्याचं स्वातंत्र्य दिलं तरच 'अशीही बनवाबनवी’सारखा चित्रपट घडू शकतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज