अ‍ॅपशहर

अमिताभ बच्चन यांच्या एका नकारामुळे तुटली सलीम- जावेद यांची जोडी? वाचा काय घडलं होतं नेमकं

हिंदी सिनेमाविश्वामध्ये सलीम जावेद या पटकथा लेखक जोडीने एक काळ गाजवला होता. या दोघांनी मिळून लिहिलेले सिनेमे प्रचंड लोकप्रिय झाले होते, त्यामुळे ही जोडी आणि यशस्वी सिनेमा असे समीकरण रूढ झाले होते. परंतु जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता...

guest Amita-Bade | Lipi 21 Jan 2022, 4:16 pm

हायलाइट्स:

  • सलीम जावेद जोडगोळी वेगळे होण्यामागे अमिताभ बच्चन?
  • अमिताभ यांनी मिस्टर इंडिया सिनेमात काम करायला दिला होता नकार
  • 'रिटन बाय सलीम जावेद : द स्टोरी ऑफ हिंदी सिनेमाज ग्रेटेस्ट स्क्रीनरायटर' पुस्तकात उल्लेख
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amitabh bachchan rejected movie mr india which led to the end of salim javed jodi
अमिताभ बच्चन यांच्या एका नकारामुळे तुटली सलीम- जावेद यांची जोडी? वाचा काय घडलं होतं नेमकं
मुंबई : जावेद अख्तर आणि सलीम खान हे एकेकाळी अतिशय ख्यातनाम पटकथा लेखक म्हणून ओळखले जायचे. या जोडीने लिहिलेले अनेक सिनेमे लोकप्रिय झाले. त्यांच्या पटकथा असलेल्या सिनेमांनी हिंदी सिनेमाविश्वात नवीन इतिहास घडवला. परंतु जेव्हा या जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा इंडस्ट्रीमधील सर्वांना मोठा धक्का बसला. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार ही जोडी विभक्त होण्यामागचे कारण दुसरे तिसरे कुणी नाही तर खुद्द अमिताभ बच्चन असल्याचे समोर आले होते... नेमके काय कारण होते...
सलीम-जावेद जोडीने शोले, त्रिशूल, यादों की बारात यांसारख्या हिट सिनेमांच्या पटकथा लिहिल्या होत्या. त्यानंतर ही जोडी १९८१ मध्ये वेगळी झाली. सलीम आणि जावेद जोडी विभक्त झाल्यानंतर सलीम काही काळासाठी लंडनला गेले होते. तर जावेद अख्तर यांनी एकट्याने काम करायला सुरुवात केली. हळूहळू मीडियाने देखील हे दोघे विभक्त का झाले याची चर्चा करणे बंद केले.


परंतु २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'रिटन बाय सलीम जावेद : द स्टोरी ऑफ हिंदी सिनेमाज ग्रेटेस्ट स्क्रीनरायटर' या पुस्तकामध्ये एक वाक्य लिहिले होते. त्यामध्ये सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या जोडीबद्दल ते लिहिले होते. हे पुस्तक दीपताकीर्ती चौधरी यांनी लिहिले होते आणि वाक्य अनिता यांच्या एका मुलाखतीमधील असल्याचे नमूद केले होते.

या पुस्तकाच नमूद केले आहे की, सलीम जावेद यांनी मिस्टर इंडिया सिनेमाची पटकथा लिहिल्यानंतर सर्वात आधी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क साधला. त्या दोघांच्या मते मिस्टर इंडियाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन योग्य होते. परंतु अमिताभ यांनी या सिनेमाला नकार दिला. त्यांना या सिनेमातील अदृश्य होण्याची संकल्पना अजिबातच आवडली नाही. अभिताभ यांच्यामते त्यांचे प्रेक्षक त्यांचा केवळ आवाज ऐकण्यासाठी नाही तर त्यांना पाहण्यासाठी तिकीट विकत घेऊन सिनेमा पाहिला येतात.

अमिताभ यांच्याकडून अशा प्रकारे आलेला नकार आणि झालेला अपमान जावेद यांना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी भविष्यात सलीम जावेदची जोडी अमिताभ यांच्यासोबत काम करणार नाही अशी शपथ घेतली. अर्थात सलीम खान मात्र याबाबत साशंक होते. अनेकांच्या मते या संपूर्ण प्रकरणात त्यांनी महत्त्वाची परंतु वेगळी भूमिका घेतली आणि ही जोडी वेगळी झाली. अर्थात ही जोडी वेगळे होण्यामागचे हेच खरे कारण आहे का याबद्दल मात्र साशंकताच आहे. ही जोडी वेगळे होण्यामागचे खरे कारण अजूनही समोर आलेले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज