अ‍ॅपशहर

काय आहे मायस्थेनिया ग्रेविस ज्याने झालं अरुण बाली यांचं निधन; जाणून घ्या कारणं, लक्षण आणि उपाय

Arun Bali Death- ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं वयाच्या ७९ व्या वर्षी मायस्थेनिया ग्रॅव्हिस या आजाराने निधन झालं. आज पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, हा आजार कसा होता आणि त्याची लक्षणं काय ते जाणून घेऊ.

Authored byमधुरा नेरुरकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2022, 11:41 am
मुंबई- प्रसिद्ध अभिनेतेअरुण बाली यांचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. पहाटे ४.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते गेल्या अनेक महिन्यांपासून मायस्थेनिया ग्रॅव्हिस नावाच्या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज संपली. नक्की हा आजार काय आहे आणि तो कशामुळे होतो त्याची काही ठळक कारणं आज पाहू. विशेष म्हणजे फक्त अरुण बाली यांनाच हा आजार नाही. बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन हेही या आजाराने ग्रस्त आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Arun Bali


काय आहे मायस्थेनिया ग्रॅव्हिस- मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर आहे. यामध्ये आपल्या शरीराच्या स्नायूंमध्ये असा अशक्तपणा येतो की त्यांनं हालचाल करणंही कठीण होतं. जेव्हा आपल्या चेतापेशी आणि स्नायू यांच्यातील संवाद तुटतो तेव्हा असं घडते. यामुळे आपल्या स्नायूंच्या आकुंचनामध्ये अडथळा निर्माण होतो आणि परिणामी स्नायू कमकुवत होऊ लागतात.

View this post on Instagram A post shared by arun bali (@arun_k_bali)

मायस्थेनिया ग्रॅव्हिसची लक्षणं- मायस्थेनिया ग्रॅव्हिसच्या बाबतीत, रुग्णाने शारीरिक हालचाली थांबवल्या पाहिजेत. सक्रिय राहिल्याने स्थिती बिघडू शकते तर विश्रांतीमुळे रुग्णाची स्थिती सुधारते. मायस्थेनिया ग्रॅव्हिसच्या लक्षणांमध्ये बोलण्यात अडचण, वस्तू उचलण्यात अडचण, पायऱ्या चढण्यात अडचण, श्वास घेण्यास त्रास, चघळण्यात किंवा गिळण्यात त्रास, थकवा आणि आवाजात जडपणा यांचा समावेश होतो.

मायस्थेनिया ग्रॅव्हिस का होतो - मायस्थेनिया ग्रॅव्हिसमध्ये, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. हे ऍसिटिल्कोलीनचा प्रभाव कमी करतं. हा मज्जातंतू पेशी आणि स्नायू यांच्यातील संवादासाठी जबाबदार एक महत्त्वाचा पदार्थ आहे. अशा स्थितीत स्नायू कमकुवत होण्याची समस्या उद्भवते.

काय आहे उपचार - मायस्थेनिया ग्रॅव्हिसवर कोणताही इलाज नाही. त्याच्या लक्षणांवर उपचार करून त्यावर नियंत्रण ठेवता येते.
लेखकाबद्दल
मधुरा नेरुरकर
मधुरा नेरुरकर, महाराष्ट्र टाइम्समध्ये सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा प्रिंट आणि डिजिटल मीडियातील १२ वर्षांचा अनुभव आहे. मनोरंजन, लाइफस्टाइल क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख