अ‍ॅपशहर

'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट'ला मिळालं 'स्टँडिंग ओवेशन', आर. माधवनवर कौतुकाचा वर्षाव

Rocketry At Cannes: आर माधवन यानं दिग्दर्शित केलेल्या 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' या सिनेमावर कान्समध्ये कौतुकाचा वर्षाव झाला आहे. सिनेमाचा प्रिमियर कन्वेंशन सेंटरमध्ये झाला. उपस्थितांनी उभं राहून सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे.

guest Amita-Bade | Lipi 21 May 2022, 5:27 pm
मुंबई- अभिनेता आर माधवन आता दिग्दर्शक झाला आहे. आर माधवन यानं दिग्दर्शित केलेला 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' या सिनेमाचा प्रीमिअर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. हा सिनेमा कन्वेंशन सेंटरमध्ये दाखवण्यात आला. तिथं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी उभं राहून या सिनेमाचं कौतुक केलं. इतकंच नाही तर १० मिनिटे टाळ्यांच्या कडकडाट करण्यात आला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cannes r madhavans rocketry the nambi effect receives standing ovation
'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट'ला मिळालं 'स्टँडिंग ओवेशन', आर. माधवनवर कौतुकाचा वर्षाव


View this post on Instagram A post shared by R. Madhavan (@actormaddy)

फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' या सिनेमा मिळालेल्या प्रतिसादाबद्दल माधवन खूपच भारावून गेला होता. त्यानं सांगितलं की, 'मी खूपच भारावून गेलो आहे. या कौतुकामुळे मी उत्साहित ही झालो आहे. केवळ माझ्याच साठी नाही तर आमच्या संपूर्ण टीमसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. तुम्ही सर्वांनी जो पाठिंबा, समर्थन दिलं त्यासाठी मनापासून आभारी आहे. हा सिनेमा १ जुलै रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.'

View this post on Instagram A post shared by R. Madhavan (@actormaddy)

सिनेमाचं चित्रीकरण भारताबरोबरच फ्रान्स, कॅनडा, जॉर्जिया आणि सैबेरियामध्ये झालं आहे. सिनेमात काही आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकारांनीही काम केलं आहे. त्यामध्ये फिलीस लोगान, विसेंट रियोटा आणि रॉन डोनाची यांचा समावेश आहे. तसंच सुपरस्टार शाहरुख खान, सूर्या यांच्या खास भूमिका ही सिनेमात आहेत.

View this post on Instagram A post shared by R. Madhavan (@actormaddy)

दरम्यान, या सिनेमाची निर्मिती तिरंग फिल्म, वर्गीज मूलन पिक्चर्स यांनी केली आहे. हा सिनेमा येत्या १ जुलै रोजी हिंदी,इंग्रजी, तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

'आम्ही देखील माणसंच' साराच्या नात्याबाबत कार्तिकनं सोडलं मौन

महत्वाचे लेख