अ‍ॅपशहर

‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ प्रेक्षकांच्या भेटीला

ए काऊ …ए काऊ… अशी आपल्या बायकोला हाक मारणारे चिमणराव… किंवा ‘चिमण, अरे चिमण्या हा काय घोळ घालून ठेवला आहेस तू, आता तो मलाच निस्तरावा लागणार’ म्हणाणारे गुंड्याभाऊ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2020, 7:16 pm
मुंबई: करोना विषाणूचा संसर्ग जास्त लोकांना होऊ नये म्हणून केंद्र सरकाने २१ दिवसांचं लॉकडाउन घोषित केलं. या २१ दिवसांमध्ये प्रत्येक व्यक्तीला घरात राहणं बंधनकारक आहे. लॉकडाउन आणि सोशल डिस्टेंसिंग साधण्यासाठी दुरदर्शननं 'रामायण' ही मालिका पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर सह्याद्री वाहिनीनं देखील गाजलेल्या अशा मराठी मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chimanrao gundyabhau marathi serial going to telecast on dd sahyadri
‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ प्रेक्षकांच्या भेटीला


सह्याद्रीवर दाखण्यात येणारी ही मालिका आहे 'चिमणराव आणि गुंड्याभाऊ'. मराठी प्रेक्षकांच्या आजही आठणीत असलेल्या मालिकांपैकी ही एक मालिका. मुंबई दूरदर्शनवर सादर करण्यात आलेली ही मालिका त्यावेळी देखील प्रचंड गाजली होती. विनोदी लेखक चि.वि जोशी यांच्या 'चिमणराव व गुंड्याभाऊ' यांच्या गोष्टींवर ही मालिका आधारित होती.

'या' दोन जुन्या मराठी मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
‘चिमणराव आणि गुंड्याभाऊ’ ही भारतातील पहिली टीव्ही मालिका होती.मराठी प्रेक्षकांप्रमाणेच अमराठी प्रेक्षकांनाही आवडायची. . दर महिन्याच्या चौथ्या बुधवारी सायंकाळी सात वाजता ही मालिका प्रसारित होत होती. मालिकेचे ३७ भाग प्रसारित झाले होते. मालिकेचे सुरुवातीचं लेखन व. पु. काळे यांनी केलं तर नंतर ही जबाबदारी श्रीधर घैसास यांनी सांभाळली होती. गुंड्याभाऊची भूमिका बाळ कर्वे यांनी साकरली होती तर चिमणरावांच्या भूमिकेत अभितेते दिलीप प्रभावळकर होते.
'चिमणराव आणि गुंड्याभाऊ' ही मालिका रोज रात्री ७.३० वा. आणि रात्री १०.०० व. दाखवण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज