अ‍ॅपशहर

लॉकडाउनमध्ये दीपिकाचं ऑनलाइन स्क्रीप्ट्स वाचन सुरू

करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सध्या जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देशातही रुग्णांचा आकडा वाढतो आहे. संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारद्वारे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2020, 3:51 pm
मुंबई: प्रत्येक कलाकार लॉकडाउनच्या वेळेचा काही ना काही उपयोग करून घेतोय. अभिनेत्री दीपिका पडुकोणचंच घ्या. ती सध्या ऑनलाइन स्क्रीप्ट्स वाचतेय. निर्मात्यांशी तिच्या व्हर्च्युअल मीटिंग्ज सुरू आहेत. आधी घोषित झालेल्या प्रोजेक्ट्सवरही ती घरबसल्या काम करतेय. त्याबरोबरच आपले आगामी प्रोजेक्ट निवडण्यासाठी आणि जगभरातील चाहत्यांसाठी अधिक यादगार व्यक्तिरेखा साकारण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नव्या स्क्रीप्ट्सही ऐकते आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपिका पडुकोण
लॉकडाउनमध्ये दीपिकाचं ऑनलाइन स्क्रीप्ट्स वाचन सुरू


लॉकडाउन नसता, तर दीपिका आता श्रीलंकेमध्ये शकुन बत्रा यांच्या आगामी 'अनटाइटल्ड' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असती. यात तिच्यासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेदेखील दिसणार आहेत. पण, लॉकडाउन संपल्यानंतरच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होईल. त्यानुसार ती शूटिंगच्या तारखांची नव्यानं जुळवाजुळव करण्याच्या तयारीलाही लागली आहे.

आतापर्यंत दीपिकानं साकारलेल्या 'पिकू', 'ये जवानी है दीवानी'मधली नैना, 'बाजीराव मस्तानी'मधली 'मस्तानी', कॉकटेलची 'वेरोनिका' या व्यक्तिरेखा चाहत्यांना आवडल्या होत्या. तिच्या नव्या भूमिकांसाठीही चाहते प्रतीक्षेत आहेत.

एकमेकांना सावरत पुढे जाऊ: अश्विनी भावे

जॉर्ज फ्लॉइड हत्येचा निषेध करणारे साधूंच्या हत्येवर गप्प होते: कंगना

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज