अ‍ॅपशहर

अमृता फडणवीसांचं चाहत्यांना आणखी एक खास सरप्राइज, आता अल्बम नव्हे तर चित्रपटासाठी गायलं गाणं

Amruta Fadnavis new song: अमृता यांच्या प्रत्येक गाण्याला नेटकरी प्रचंड प्रतिसाद देताना दिसतात. त्यांच्या प्रत्येक गाण्याला लाखो व्हीव्यू मिळतात. यापूर्वी अमृता यांनी मकर संक्रांतीला शेअर केलेला एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2023, 8:27 pm
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि लोकप्रिय गायिका अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. त्यांच्या या गाण्याला प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. आता त्यांच्या चाहत्यांसाठी आणखी एक खास सरप्राइज मिळालं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amruta fadnavis new song


अमृता फडणवीस यांनी अनेक अल्बमसाठी गायन केलं आहे. दरम्यान आता एका चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केलं आहे. आगामी (भारतीयन्स) BHARATEEYANS या चित्रपटातील अमृता फडणवीस यांनी गायललं गाणं नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.

दरम्यान, 'वर्षातील सर्वात मोठे बॅचलोरेट अँथम' अशी घोषणा करत अमृता फडणवीस यांनी 'अज मैं मूड बणा लेया...' हे गाणं प्रदर्शित केलं होतं. टी-सीरिज या बड्या म्युझिक कंपनीनं हे गाणं लाँच केलेअसून अविनाश मिश्रा आणि मेहक घई यांसारखे टीव्ही स्टारही अमृता यांच्यासह स्क्रिन शेअर करतायंत. या गाण्यात अमृता यांचा अवतारही काहीसा मॉडर्न असून त्याला एथनिक ट्विस्ट देण्यात आला आहे. बोहो-चिक आउटफिट आणि मॉर्डन ज्वेलरीमुळं त्यांच्या या लूकची विशेष चर्चा झाली.

View this post on Instagram A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

अमृता यांचं हे गाणं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कसं वाटलं याबाबत अमृता यांना विचारण्यात आलं होतं. तेव्हा त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती, की त्यांना गाणं आवडलं पण ट्रोलिंगची भीती वाटली होती. पण ज्या पदावर ते आहेत, त्यावर अर्ध्याहून अधिक लोकांकडून ट्रोलिंग होणं अपेक्षित आहे, असंही त्या म्हणाल्या.

महत्वाचे लेख