अ‍ॅपशहर

'घटस्फोट साजरा केला पाहिजे' धनुषचे लग्न मोडल्यानंतर राम गोपाल वर्मांचं वादग्रस्त ट्वीट

प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे त्यांच्या वादग्रस्त ट्वीटमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी तीन ट्विट केले आहेत. ज्यात ते लग्न ही समाजात पूर्वजांनी लादलेली वाईट प्रथा आहे असं सांगितले आहे.

guest Arpita-Deo | Lipi 19 Jan 2022, 3:32 pm
मुंबई- दाक्षिणात्य सुपस्टार धनुष आणि पत्नी ऐश्वर्या रजनीकांत लग्नाच्या १८ वर्षानंतर विभक्त झाले. त्यांनी घटस्फोट घेत असल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे दिली. त्यानंतर ट्वीटरवर धनुष ट्रेण्ड झाला. सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकांनी या बातमीवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अशात दिग्दर्शक- निर्माते राम गोपाल वर्मा यांनी एकामागून एक ट्वीट करत, लग्न ही समाजात पूर्वजांनी लादलेली वाईट प्रथा असल्याचं म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dhanush aishwarya divorce ram gopal varma controversial tweet
'घटस्फोट साजरा केला पाहिजे' धनुषचे लग्न मोडल्यानंतर राम गोपाल वर्मांचं वादग्रस्त ट्वीट




धनुष- ऐश्वर्याचं लग्न का मोडलं? पहिल्या भेटीपासून ते घाईत केलेल्या लग्नापर्यंत, जाणून घ्या सर्वकाही

राम गोपाल वर्मा यांनी एकामागोमाग एक अशी तीन ट्वीट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'लग्न शांतपणे केलं पाहिजे कारण ही एकमेकांच्या खतरनाक गुणांची ओळख करून घेण्याची प्रक्रिया असते. तर घटस्फोट हे संगीत ठेवून आनंदाने साजरं केला पाहिजे. कारण तुम्ही बंधनातून मुक्त होत असता. त्यामुळे हा क्षण साजरा केला पाहिजे.' तर तिसऱ्या ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी लिहिले, 'तरुणांना लग्नाच्या धोक्यांबद्दल चेतावणी देण्यासाठी कलाकारांचे घटस्फोट हे चांगले ट्रेंड सेटर आहेत.'



नेटकऱ्यांनी फटकारले

राम गोपाल वर्माच्या यांनी ट्वीटमध्ये धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी हे ट्वीट त्यांच्यासाठीच होतं, असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे राम गोपाल वर्मा यांच्या ट्वीटला विरोध करत त्यांना सुनावले. एका यूजरने लिहिले, 'म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही दर दोन दिवसांनी प्रेम शोधले पाहिजे, अहो सर पण प्रेम काय अॅमेझॉनवर मिळणारी गोष्ट आहे का?' दुसऱ्या युजरने लिहिले, 'लग्न म्हणजे प्रवेश घेतल्या नंतर बाहेर पडायचं नाटक किंवा खेळण्याची गोष्ट नाही. लग्नामुळे दोन मन जुळली जातात आणि आजकाल लोक किती सहजपणे काही कारण नसताना घटस्फोट घेतात.' तर काही यूजर्सने राम गोपाल वर्मांना 'लग्न हे दीर्घकालीन आकर्षण आहे' म्हणत त्यांचं समर्थन करताना दिसले.

धनुष- ऐश्वर्याचा Video पाहून चाहत्यांच्या काळजात झालं चर्रर्रर्र, म्हणे होत्याचं नव्हतं झालं!



प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा अनेकदा वादग्रस्त ट्वीट करत असतात. अशा परिस्थितीत धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतच्या विभक्त होण्याच्या बातम्या आणि नंतर त्यांचे ट्वीट काही मोठी गोष्ट नाही. मात्र या वेळी यूजर्सने त्यांना चांगलंच सुनावले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज