मुंबई: 'महाराष्ट्राची क्रश' असणाऱ्या हृता दुर्गुळेचा (Happy Birthday Hruta Durgule) आज वाढदिवस आहे. चाहत्यांप्रमाणेच सिने इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान ज्या दिग्दर्शकासोबत अभिनेत्री सिनेविश्वात पदार्पण केले, त्या रवी जाधव यांनीही हृतासाठी खास पोस्ट केली आहे. हृताच्य अलीकडेच आलेल्या 'टाइमपास ३' आणि 'अनन्या' .या सिनेमांमध्ये तिने रवी यांच्यासोबत काम केले आहे. हृताचे काही फोटो शेअर करत त्यांनी एक छानसा संदेश अभिनेत्रीला दिला आहे. रवी जाधव (Ravi Jadhav Post for Hruta Durgule) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये हृता स्कुटरवर बसून पोज देत आहे. एका फोटोमध्ये रवी स्वत: तिच्या पाठीमागे बसले आहे. दिग्दर्शक आणि अभिनेत्रीच्या या जोडीचे प्रेक्षकांनी तर कौतुक केलेच होते, आता त्यांच्यातील खास बाँडही चाहत्यांना पाहायला मिळतो आहे.
हे वाचा-हृताला नवरा म्हणतोय 'Love' तर इंद्राही झाला रोमँटिक; अभिनेत्रीसाठी केल्या खास पोस्ट
रवी जाधव यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, 'तुझं आयुष्य लवकरच जलद होणार आहे आणि स्ट्रॅटोस्फीअरमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज आहे. हेल्मेट घाल आणि तुझं आयुष्य एंजॉय कर. वाढदिवसाच्या शुभेच्छा हृता दुर्गुळे!' रवी यांच्या या पोस्टवर हृताचे चाहतेही वाढदिवसाच्या पोस्ट करत अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत.
रवी जाधव यांची निर्मिती असणाऱ्या 'अनन्या' सिनेमातून हृताने सिनेविश्वात पदार्पण केले. त्यानंतर काहीच दिवसात तिचा दुसरा सिनेमा 'टाइमपास ३' प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन रवी यांचे होते. या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यश मिळवले होते.
हे वाचा-घर, नियम, सलमानचा लूक; बिग बॉस १६ मध्ये बदललं सर्वकाही! दिसली सिद्धार्थची झलक
दरम्यान अभिनेत्री हृता दुर्गुळे लवकरच महेश मांजरेकर यांच्या 'एका माळेचे मणी' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या ओटीटी पदार्पणात ती प्रशांत दामले यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.