अ‍ॅपशहर

'तो माझ्या भावासारखा', ज्याच्यासह इंटिमेट सीन केले त्या अभिनेत्यासोबत वाद? अभिनेत्रीनं दिलं स्पष्टीकरण

Fifty Shades of Grey Actress Dakota Johnson on Jamie Dornan: अभिनेत्री डकोटा जॉन्सन हिने तिच्या अलीकडच्या मुलाखतीमध्ये तिचा 'फिफ्टी शेड्स' या सिनेमा सीरिजमधील सहकलाकार जेमी डॉर्नन याच्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jun 2022, 3:16 pm
मुंबई: अभिनेत्री डकोटा जॉन्सन 'फिफ्टी शेड्स' या तीन सिनेमांच्या सीरिजमधील मुख्य अभिनेत्री आहे. 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे'मुळे या Dakota हिला विशेष लोकप्रियता मिळाली होती. सध्या ती तिच्या Madame Web या सिनेमामुळे चर्चेत आली आहे. दरम्यान हल्ली अशी चर्चा सुरू होती की तिचे 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे'मधील अभिनेता जेमी डॉर्नन याच्यासह भांडण झाले आहे. मात्र अभिनेत्रीने तिच्या अलीकडच्याच एका मुलाखतीमध्ये याचे खंडन केले आहे. अभिनेत्रीने त्यांचं नातं नेमकं काय आहे याचा उल्लेख केला असून सिनेमातील त्यांच्या इंटिमेट सीन्सबद्दलही तिने भाष्य केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Fifty Shades of Grey


जॉन्सनने हे वृत्त फेटाळले आहे की तिचे 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे'च्या सेटवर जेमीसह पटत नव्हते. तिने असेही म्हटले की तो तिच्यासाठी भावासारखा आहे, त्यांनी एकमेकांवर नेहमी विश्वास ठेवला होता, असेही तिने म्हटले होते.

हे वाचा-या दिवशी येणार पुष्पा २, मेगास्टारचीही सिनेमात नवी एण्ट्री

तिने असे म्हटले की, 'अशी वेळ कधी आली नाही की आमचं पटलं नाही. मला माहित आहे की हे विचित्र आहे, परंतु तो माझ्यासाठी भावासारखा आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. आम्ही नेहमी एकमेकांसाठी असायचो. आम्ही खरंच एकमेकांवर विश्वास ठेवला होता आणि एकमेकांचे संरक्षण केले होते.'

View this post on Instagram A post shared by Fifty Shades Freed (@fiftyshadesmovie)


या मुलाखतीमध्ये त्यांच्या शूटिंग दरम्यानच्या काळाविषयी बोलताना तिने असेही म्हटले की, 'आम्ही खूप वर्षांपासून अजब गोष्टी करत होतो आणि आम्हाला एक टीम म्हणून राहणे आवश्यक होते'.

हे वाचा-'जेव्हा पाप वाढतं तेव्हा विनाश होतोच..', शिवसेनेवर कंगनाची पुन्हा एकदा आगपाखड

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शेवटचे अभिनेत्री 'Am I ok?' या सिनेमात दिसली होती. Tig Notaro आणि Stephanie Allynne यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. लॉरेन पॉमेरॅट्झ यांनी या एम आय ओके या सिनेमा लिहिला असून यामध्ये सोन्यो मिझूनो, जेरमीन फॉलर, कायरेस्की क्लेमॉन्स, मोली गॉर्डन आणि सीन हेज अशी स्टारकास्ट होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज