अ‍ॅपशहर

उपेन पटेलच्या प्रदर्शित न झालेल्या सिनेमामुळे अडकले सुंदर पिचाई, नेमके काय आहे कारण

कॉपीराइट उल्लंघन प्रकरणी चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि यूट्यूबविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. सुनील यांच्या म्हणण्यानुसार, कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्यामुळे त्यांना अखेर न्यायालयाची पायरी चढावी लागली.

guest Ganesh-Mhaske | Lipi 27 Jan 2022, 2:31 pm
मुंबई- सिनेनिर्माते सुनील दर्शन यांनी त्यांच्या 'एक हसीना थी एक दीवाना था' या सिनेमाचे यूट्यूबवरील कॉपीराइट उल्लंघन थांबवण्यासाठी कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. सुनील दर्शन यांनी गुगल, त्याचे सीईओ सुंदर पिचाई आणि काही अधिकार्‍यांविरुद्ध कॉपीराइट उल्लंघन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम filmmmaker suneel darshan files fir against google ceo sundar pichai youtube
उपेन पटेलच्या प्रदर्शित न झालेल्या सिनेमामुळे अडकले सुंदर पिचाई, नेमके काय आहे कारण


Video- हार्दिकचा आजीसोबतच्या डान्सवर अल्लु अर्जुनही फिदा

यूट्यूबवरील अनेक युजर्स त्यांच्या सिनेमा आणि संगीताच्या माध्यमातून भरपूर कमाई करत आहेत आणि त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप सुनील दर्शन यांनी केला आहे. एफआयआरमध्ये सुनील दर्शन यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह सहा गुगल कर्मचाऱ्यांच्या नावाचाही यावेळी उल्लेख करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण


या प्रकरणाबाबत सुनील दर्शन यांनी ई-टाइम्सला सांगितले की, 'मी कुठेही हा सिनेमा अपलोड केलेला नाही किंवा जगभरात कोणालाही विकला नाही. असं असतानाही माझा चित्रपट YouTube वर लाखो वेळा पाहिला गेला आहे. मी गुगलला अनेकदा चित्रपट YouTube वरून काढून टाकण्याची विनंती केली. यासाठी चपला झिजवल्या. शेवटी मी इतका कंटाळलो की मला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. सुदैवाने, न्यायालयाने माझ्या बाजूने आदेश दिला आणि पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले.

मौनी रॉयचा नवरा आहे तरी कोण? त्याच्या संपत्तीचा आकडा वाचून येईल चक्कर

'१ अब्जाहून अधिक कॉपीराइट उल्लंघन, प्रत्येकाचा रेकॉर्ड आहे'

सुनील दर्शन पुढे म्हणाले, 'एक अब्जाहून अधिक कॉपीराइट उल्लंघन झाली आहेत आणि माझ्याकडे प्रत्येकाची नोंद आहे. हे अशा लोकांबद्दल आहे जे दावा करतात की ते कायद्याचे पालन करतात आणि आता त्यांच्याकडे कोणतीही व्यवस्था नाही. माझ्या व्हिडिओंमधून जे पैसे कमवत आहेत त्यांना खूप फायदा होत आहे. मी तंत्रज्ञानाला आव्हान देत नसून जे याचा गैरवापर करत आहेत त्यांना आव्हान देत आहे.'


'माझ्या चित्रपटाचे संपूर्ण मूल्य मी गमावलं'

सुनील दर्शन पुढे म्हणाले की, ते फक्त त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. त्यांना आश्चर्य वाटतं की कोणलाही या चित्रपटाचे कॉपीराइट्स विकलेले नसताना तसेच कोणत्याही प्लॅटफॉर्मवर शेअर केले नसताना त्यांच्या कन्टेटचा कोणी आणि कसा वापर करू शकतं. सुनील दर्शन म्हणाले की त्यांनी चित्रपटाचे संपूर्ण मूल्य गमावले आहे. असं त्यांनी यापूर्वी केले आहे. पण तो पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. २५ जानेवारी रोजी या प्रकरणी कलम ५१, ६३ आणि ६९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज